मदुराई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील महत्त्वाच्या विवीध 22 नेत्यांवर हल्ला करण्याचा कट आखणाऱ्या 3 दहशतवाद्यांना पालिसांनी अटक करण्यात आली आहे. हे तीनही संशयीत दहशतवादी अल-कायदा या दहशतवादी संघटनेचे असून, एम. खरीम, असिफ सुलतान मोहम्मद आणि अब्बास अली अशी या तिघांची नावे आहेत.

राष्ट्रय तपास यंत्रणेच्या पथकाने शहरात सोमवारी टाकलेल्या छाप्यात हे दहशतवादी हाताला लागले. देशातील वेगवेगळ्या दूतावासांना धमकी देण्यातही या दहशतवाद्यांचा हात आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील टॉप 22 नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती याच दहशतवाद्यांकडून पोलिसांना मिळाल्याचे समजते. दरम्यान, तिनपैकी दोघांना एकाच ठिकाणावरून तर, तिसऱ्याला अन्य एका ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले. तिघांपैकी खरीम याला उस्माननगर येथून पोलिसांनी अटक केली, तर असिफ सुलतानला जी. आर. नगरमधून आणि अब्बास अली याला इस्लाईलपुरम येथून अटक केली.

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेला त्यांच्या गुप्त सुत्रांकडून माहिती मिळाली होती की, दक्षिण तामिळनाडूच्या मदुराईजवळ अल-कायदा या दहशतवादी संघटनेचे संशयीत दहशतवादी दडून बसले आहेत. माहिती मिळताच तपास यंत्रणेने वेळीच कारवाई करत छापे टाकले. त्यात हे तिन दहशतवादी हाताला लागले. या दहशतवाद्यांकडून स्पोटकं आणि शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.(हेही वाचा, महाराष्ट्र भाजपचे पंतप्रधान मोदींकडून कौतूक, जनतेचही मानले आभार)

दरम्यान, देशातील काही मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची शंका यापूर्वीच बोलून दाखवली होती. या पार्श्वभूमिवर हे दहशतवादी सापडल्याने या शंकेला दुजोरा मिळत असून, पंतप्रधान मोदी यांची सुरक्षा पाहणाऱ्या यंत्रणांवर मोठी जबाबदारी आली आहे. दरम्यान, अन्य 22 नेते कोण याबाबत माहिती मिळू शकली नाही.