देशाच्या 14 व्या राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान केलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत आहे. मात्र पाठिंब्याचा विचार केला तर सध्या तरी कोविंद यांचं पारडं जड मानलं जात आहे.

CM

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईतही आमदारांचं मतदान होत आहे. विशेष म्हणजे जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदमही यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं हे दोघेही मतदान करतील. (हे पण वाचा – आज होणार राष्ट्रपतीपदासाठी मतदान : कौल कोणाच्या बाजुने ?)  

सकाळपासूनच मतदानासाठी खासदारांनी रांगा लावल्या आहेत. इकडे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश सगळीकडे त्या त्या राज्यातल्या आमदारांनी मतदानाला सुरुवात केली आहे.