नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्यानंतर त्यावरुन अपशब्दांचा वापर करुन अनेक ट्विट्स केले जात आहेत.

rg-5

राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करुन त्याच्या माध्यमातून अपशब्द वापरुन ट्विट केले जात आहेत. या प्रकारामुळे काँग्रेस नेत्यांसोबतच, कार्यकर्त्यांनाही एक धक्का बसला आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, ही खुपच खालच्या पातळीवरील कृती आहे. मात्र, असे झाले असले तरीही राहुल गांधी गरिबांसाठी काम करतच राहणार.

बुधवारी संध्याकाळी राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट पाहिल्यानंतर ट्विटर युझर्सला एकच धक्का बसला. कारण, राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन काँग्रेस नेते, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याबाबत अपशब्द वापरुन अनेक ट्विट्स केले होते.

rg-4

अकाऊंट हॅक करणा-याने ट्विट करत लिहिले आहे की, या देशातील नागरिकांना लुटण्याचा मला प्रेम मिळते, गेल्या ६० वर्षांपासून माझ्या परिवाराने या देशाला लुटलं आहे.

rg-collage

राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर एकामागोमाग एक असे अनेक ट्विट्स करण्यात आले ज्यामध्ये त्यांच्या परिवाराला भ्रष्टाचारी म्हणून संबोधण्यात आले असुन अपशब्दही वापरले आहेत. या प्रकारचे ट्विट्स होत असल्याने ट्विटर युझर्सच्या लक्षात आले की, राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे.