बंगळुरु – नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्य नागरिक नव्या नोटा मिळविण्यासाठी बँक आणि एटीएमच्या बाहेर रांग लावत असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. मात्र, असे असताना बंगळुरुमध्ये तब्बल ४ कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. आयकर विभागाने बंगळुरुमध्ये छापे टाकून ४.७ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन सरकारी अभियंते आणि त्यांच्या संबंधीत घरी हे छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यामध्ये २ हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या असुन ज्याची किंमत तब्बल ४.७ कोटी रुपये आहे. यासंदर्भात आयकर विभागाने त्याची चौकशी सुरू केली आहे. (हे पण पाहा: घरात सोनं ठेवण्यावर निर्बंध, यापेक्षा जास्त सोनं असल्यास द्याव लागणार स्पष्टीकरण)

या प्रकरणात बँक कर्मचारीही सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात असुन आयकर विभाग त्या दिशेनेही आपला तपास करत आहे. पहिल्यांदाच नवीन नोटा चलनात आल्यानंतर ही सर्वांत मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे.