नवी दिल्ली: ऐकावे ते नवलच. चोर कधी दयाळू असू शकतो का? चोरीच्या पैशातून समाजकार्य करण्याची त्याला आवड असून शकते का?, असा प्रश्न कोणाला विचारला तर, समोरच्याच्या तोंडाचा ‘आ’ मिटायला बराच वेळ जाईल. पण, आता आम्ही ज्या चोराबद्धल सांगणार आहोत ते ऐकून तुमच्या तोंडाचा ‘आ’ मात्र नक्कीच वासेल. करण, दिल्ली पोलीसांनी खरोखरच अशा एका दयाळू आणि मायाळू चोराला अटक केली आहे. हा चोर श्रीमंतांकडे चोरी करायचा आणि गावी जाऊन गरीब मुलींचे कन्यादान करायचा. तसेच, आरोग्य शिबीरेही तो भरवत असे.

त्याची चोरी करण्याची पद्धतही विशिष्ट आहे. पोलीसांनी अटक केलेल्या या चाराचे खरे नाव इरफान असे आहे. पण, बिहारच्या सीतामढी जिल्ह्यतील एका गावात त्याला बाबू म्हणून ओळखले जाते. तो कुणीतरी मोठा व्यवसायीक असल्याचीही भावना येथील लोकांच्या मनात आहे. पोलीसांचे म्हणने असे की, तो एक सराईत चोर आहे. तो शहरांत जाऊन श्रीमंत लोकांची घरे हेरून ठेवायचा. कुणी नसल्याचे पाहून ती घरे तो फोडत असे आणि त्यातून आलेल्या पैशांतून गावी जाऊन गरीब मुलींच्या लग्नासाठी मदत करत असे. त्याने अनेक आरोग्य शिबीरेही भरवली आहेत. गावात तो केवळ कुर्ता पायजमा वापरतो. पण, शहरात येताच तो आपला चेहरामोहराच बदलून टाकतो. शहरामध्ये तो अत्यंत अधुनीक असतो. गावच्या या मदतकर्त्याला पोलीसांनी जेव्हा पकडले तेव्हा लोकांना विश्वासच बसला नाही. ते पोलीसांनाच विरोध करू लागले. (हेही वाचा, चोर आला पण पळून जायचा विसरला)

दक्षिणी पूर्व दिल्लीचे अतिरिक्त उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान दोन प्रकारची जीवनशैली जगत असे. शहरात येऊन तो अतंत लॅवीश जीवन जगत असे. तो रोज लाखो रूपये उडवत असे. इतकेच नव्हे तर, त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आणि गर्लफ्रेंडसुद्धा आहेत. अलिकडील काळात एका भोजपूरी अभिनेत्रीसोबतही त्याचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. इरफानने संबंधीत अभिनेत्रीला सांगितले की, त्याचे नाव आर्यन खन्न असे आहे आणि तो खन्ना इडस्ट्रीजचा मालक आहे. एकदा तर त्याने गाणे ऐकण्यासाठी 10 हजार रूपये दिले होते. अनकेदा तो बालांसोबत गाणेही गात असे.