मुंबई: महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या एटीएसने संयुक्त कारवाई करत लष्कर-ए-तोयबाच्या एका संशयीत दहशतवाद्यास अटक केली आहे. सलीम खान असे या संशयीत दहशतवाद्याचे नाव असून, मुंबई विमानतळावर या संशयीतास अटक करण्यात आली.

सलीम खान हा उत्तर प्रदेशातील हाथ गावचा रहिवाशी असल्याची प्राथमीक माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच आयएसआयच्या एका एजंटला फैजाबादमधून ताब्यात घेण्यात आले होते. या एजंटला आर्थिक पूरवठा करण्याचे काम सलीम खान करत असे. दरम्यान, सैन्याची माहिती पुरवणाऱ्यांना आर्थिकपुरवठा करण्याचे कामही सलीम खानवर असल्याची प्राथमीक माहिती आहे. लष्कर-ए-तोयबाच्या मुजफ्फराबाद कॅम्पमध्ये सलीमने ट्रेनिंग घेतलं होतं. (हेही वाचा, जम्मू-काश्मीरमध्ये पाक सैन्याचा गोळीबार, दोन जवान शहीद)

सखोल चौकशीत सलीमकडून अधिक माहिती एटीएसला मिळू शकेल. सलीम हा जर खरोखरच दहशतवादी असेल तर, त्याच्यासोबत  आणखी किती एजंट सलीमसोबत काम करत आहेत, याचीही माहिती मिळणार आहे.