तिरूवनंतरपुरम:  एका बाजूला शेती म्हणजे आतबट्याचा व्यवसाय. त्यामुळे खुद्द शेतऱ्याचीच मुले शेती करणे टाळू लागली आहेत. तर, दुसऱ्या बाजूला अॅडमिशनसाठी लागणारी लागणारी लिस्ट आणि त्यातून पॉईंटवर हुकणारे अॅडमिशन, असे वास्तव आहे. ‘नो अॅडमिशन’चा असाच फटका केरळमधल्या लीजो जॉय नावाच्या एका विद्यार्थ्याला बसला आहे.

लीजोला इयत्ता 12वीच्या परिक्षेत थोडेथोडके नव्हे तर, तब्बल 79.7 टक्के मार्क्स भेटले आहेत.याचाच अर्थ तो प्रथम श्रेणीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. पण, पाचव्या यादीतही त्याला पूढील शिक्षणासाठी प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे लीजोने थेट शेती करण्याचा निर्णय घेतला. आता तो आधुनिक शेतकरी म्हणून शेती करत आहे. लीजोने आपल्या फेसबुक पेजवर शेतीमध्ये फावड्यासोबत काम करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टखाली सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेत आरक्षणाची वाईट पद्धत आहे. याच कारणामुळे आपल्याला शेतीची निवड करावी लागली, अशी पोस्टही त्याने लिहीली आहे.

दरम्यान, शेती करावी लागल्याबद्धल तो जराही दु:खी नाही. अॅडमिशन न भेटल्याबद्धल त्याला जरूर दु:ख आहे. मात्र, शेतकरी होण्याचा आपल्याल गर्व असून, आपण समाजाचे बळी ठरलो म्हणूनच शेतकरी झाल्याचे लीजो सांगतो.तसेच, आरक्षणाच्या धोरणामुळे केवळ ५० टक्के गुण मिळवणाऱ्या आपल्या मित्रांना देखील प्रवेश मिळत असल्याचेही तो आवर्जून नमूद करतो. लीजोची ही पोस्ट भलतीच व्हायरल होत आहे.