आग्रा: स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकार विवाध स्तरावर काम करते. त्यासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ मोहिमही सरकारने सुरू केली आहे. त्याला अनेक सामाजिक संस्था साथ देऊन कामही करत आहेत. मात्र, समाजातील मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन आजही बदललेला नाही. लग्ननंतर पहिली मुलगी झाल्यावर दुसऱे आपत्यही मुलगीच झाल्याने महिलेचे डोके भादरल्याची धक्कादायक घटना सासरच्यांकडून घडली आहे. ही घटना आग्रा येथील असून, पीडित महिलेचा नवरा, सासू-सासरा यांनी मिळून हे कृत्य केले आहे.

नन्नू (नाव बदललेले आहे) असे या पीडित महिलेचे नाव आहे. राशीद नावाच्या एका टेम्पोचालकाशी नन्नूचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला. विवाहानंतर त्यांन एक चार वर्षांची मुलगी ही आहे. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर नन्नू पून्हा एकदा गरोदर राहिली. या वेळी मात्र, राशिदला नन्नूकडून मुलगा व्हावा अशी अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्या वेळीही नन्नूने मुलीलाच जन्म दिला. 27 नोव्हेंबरला नन्नू बाळंत झाली. दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याचा राग मनात धरून राशिद आणि त्याच्या घरातील इतर मंडळी नाराज झाले. ही नाराजी रागात परावर्तीत होऊन त्यांनी नन्नूचा मानसिक छळ सुरू केला. तसेच, तिच्या डोक्यावरचे केसही भादरून टाकले. ही कृरता इतक्यावरच थांबली नाही. तिला लहान बाळासंह घराबाहेर हाकलून देण्यात आले. तिची नवजात मुलगी भुकेने व्याकीळ होऊन रडायला लागल्यावरही त्यांनी तिला घरात घेतले नाही, ना त्या बाळाजवळ फिरकू दिले. काही काळाने तिच्याकडील बाळही त्यांनी काढून घेतले.(हेही वाचा, महाराष्ट्रीयन मुलीशी लग्न करण्याची ही ९ कारणं)

हा प्रकार गेली सात वर्षे सुरू होता. नन्नूला होणाऱ्या त्रासाबद्धल कोठे वाच्याता होऊ नये म्हणून तिला सतत नजरकैदेतही ठेवले जायचे. अखेर छळ असहय्य झाल्यानंतर आणि मुलीच्या विरहाने व्याकूळ झालेल्या नन्नूने आपले माहेर गाठले. तिथे तिने आपले दुख: घरच्यांना सांगितले. मुलीचा छळ आणि झालेली आवस्था पाहून माहेरच्या मंडळींनी पोलिस स्टेशन गाठत रशीद व त्याच्या घरच्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार बाहेर आला.