मित्र-मैत्रिणींमध्ये वाद-विवाद होतच असतात. मात्र, एका ठराविक काळानंतर राग शांत होतो आणि पून्हा हे मित्र-मैत्रिण एकत्र येतात. पण, पुण्यामध्ये एका तरुणाने मैत्रिण बोलत नसल्याने तिच्यावर चक्क ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी तरुण ओंकार राऊत याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार राऊत हा तरुण पिंपरी चिंचवडमधील पत्रा शेड झोपडपट्टीत राहतो. त्याच परिसरात राहणारी एक तरुणी गेल्या काही दिवसांपासून त्याच्यासोबत बोलत नव्हती. याच काराववरून रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास पीडित तरुणीला एकटीला पाहून ओंकारने तिच्यावर ब्लेडने वार केले.

ओंकार राऊत आणि पीडित तरुणी दोघेही एकाच परिसरात राहतात. मात्र, घरच्यांनी दोघांच्याही बोलण्यावर बंदी आणली. त्यामुळे मुलीने ओंकारशी बोलणे बंद केलं होतं. आपली मैत्रिण आपल्यासोबत बोलत नाही या रागातून ओंकारने तिच्यावर ब्लेडने वार केले. (हे पण पाहा: पुणे: फॉर्च्युनरमधील सामूहिक बलात्काराची घटना बनावट, महिलेने दिली कबुली)

पीडित तरुणीच्या दंडावर, पोटरीवर ब्लेडने वार केल्यामुळे ती जखमी झाली आहे. या तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, 20 वर्षीय ओंकार राऊत याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.