पुणे : दोघांचे प्रेम झाले. दोघांनी सात जन्म एकत्र राहण्याच्या शपथा घेतल्या. प्रियकराने चंद्र, सुर्य आणून देण्याची स्वप्न दाखविली. दोघांचे फ्युचर प्लानिंगही ठरले. पण प्रियकराने दगा केला. प्रियसिला सोडून दुसऱ्या मुलीशीच सुत जुळवत सात फेरे घेण्याचा निर्णय घेतला. इथे संपली प्रियकर आणि प्रियसीची कहाणी पण पुढे जे काही झाल ते अजूनही भयानक होत.

पुण्यात ही अजब घटना घडली. प्रेमात विश्वासघात करुन प्रियकर दुस-या तरुणीबरोबर विवाहबद्ध होत असल्याने संतप्त झालेल्या प्रेयसीने प्रियकराचा लग्नाचा मांडव पेटवून दिल्याची घटना पुण्यात कात्रजमध्ये घडली आहे. आरोपी तरुणीने रविवारी प्रियकराची दुचाकीही जाळली होती. प्रियसिने हे सर्व फिल्मी स्टाईलने होत होत. अखेरीस संतप्त झालेल्या प्रियकराने  33 वर्षीय प्रियकराने त्याची दुचाकी जाळल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर तपास सुरु असतानाच त्याने कोणीतरी लग्नाचा मांडव जाळल्याची तक्रार दाखल केली. (जपानच्या राजकन्येनं प्रेमासाठी केला राजपदाचा त्याग, हॉटेल वर्करच्या प्रेमात पडली राजकन्या)

लग्नाला एकदिवस उरला असताना मांडव जाळण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना खब-याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर दत्तनगर येथून आरोपी तरुणीला अटक केली. चौकशीमध्ये तिने आपणच दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. माझ प्रेम जर पुर्ण होणार नसेल तर मी तुझ लग्नही पुर्ण होऊ देणार नाही अशी तिची भावना होती. त्यामुळे आपल्याला दिलेल्या धोक्याचा तिने अशाप्रकारे बदला घेतला.    तिला 20 मे पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आपले सहावर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होते. त्याने लग्न करण्याचा शब्दही दिला होता. पण त्याने कुठलेही स्पष्टीकरण न देता दुस-या तरुणीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला.  (जेलची अधिकारी पडली कैद्याच्या प्रेमात, महिला अधिका-यावर आली जेलची हवा खान्याची वेळ)

जेव्हा त्याने मला त्याच्या लग्नाचे निमंत्रण दिले तेव्हा मला संताप अनावर झाला. तिने नवरी मुलीच्या घरी जाऊन नव-या मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. पण त्याने काहीही फरक पडला नाही. लग्न मोडले नाही. त्यामुळे अखेर तिने लग्नाचा मंडपच पेटवून दिला. त्यामुळे प्रियकराच्या नव्या संसाराचे मनसुबे जळलेल्या मंडपासोबत भस्म झाले आहेत.