मुंबई – येत्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका होणार असुन या निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं वक्तव्य भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलं. मात्र, किरीट सोमय्या यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईत पोस्टरबाजी सुरु झाली आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार या पोस्टरमधून घेण्यात आला आहे.

भाजपचे मुंबईतील खासदार यांच्यावर टीका करणारे पोस्टर मुंबईतील नरिमन पाँईट येथील भाजप कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आले आहे. ‘बीदेपी त्वबलावल ललणाल- टिलित सोमैय्या’ अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आल्याने विविध चर्चा होत आहेत.

किरीट सोमय्या यांच्या बोलण्याच्या शैलीची खिल्ली या पोस्टर्सच्या माध्यमातून उडवण्यात आली आहे. तसेच किरीट सोमय्या आणि भाजप या दोघांनाही टार्गेट करण्याचा प्रयत्न या पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आला आहे. (हे पण पाहा: मुंबईसह राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणूका मार्चमध्ये)

Image Courtesy: Loksatta
Image Courtesy: Loksatta

हे पोस्टर कुणी लावलं आहे याबाबत माहिती समोर आलेली नाहीये. पण, निवडणुकांना दोन महिने शिल्लक असताना आतापासुनच पोस्टर वॉर सुरु झाल्याने यापुढील काळात राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखीन होणार असे दिसत आहे.