मुंबईमधील १० हजार ९४७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमयूटीपी ३ म्हणजेच मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या तिस-या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ८ हजार ६७९ कोटी रूपये आहे. येत्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

एमयूटीपी ३ म्हणजे मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च ८ हजार ६७९ कोटी रुपये आहे. मात्र या प्रकल्पाचा अंदाजित खर्च वाढून १० हजार ९४७ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. (हे पण पाहा: आई-वडिलांना मुंबईतील रस्त्यांवर चालवण्याची भीती वाटते – मुंबई मनपा आयुक्त अजोय मेहता)

यासोबतच पनवेल कर्जत या पट्ट्यात २८ किमीचा उपनगरीय मार्ग, ऐरोली-कळवा एलिव्हेटेड कॉरिडोर, विरार-डहाणू रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण, ५६५ पेक्षा अधिक रेल्वे डब्यांची निर्मिती अशा अनेक प्रकल्पांना आज मंजुरी देण्यात आली आहे.