मुंबई: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकार आणि स्वत: मुख्यमंत्र्यांचा संभ्रम पुन्हा पूढे आला आहे. ‘ज्या शेतकऱ्यांची शेतीवर शंभर टक्के उपजिवीका असे त्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल’, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीवरून घुमजाव केले आहे. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या क्रार्यक्रमात ते बोलत होते. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी 15 जिल्ह्यात चार हजार कोटीचे प्रकल्प उभारणार असल्याची माहितीही त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली.

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमातून बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘उपजीविका शेतीवर अवलंबून आहे, त्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या कर्जमाफीनंतर नव्याने पीक कर्ज घेणाऱ्यासाठी सवलतीच्या दरात ते उपलब्ध करुन देऊ.शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी 15 जिल्ह्यांत चार हजार कोटीचा प्रकल्प उभारणार आहोत. तसेच, यांत्रिकीकरणातून उत्पादनवाढीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे क्लस्टर ही तयार करणार’, असल्याचे मुख्यमंत्रांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले.

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाचा पहिला भाग रविवारी प्रसारात झाला होता. रविवारच्या या कार्यक्रमात बोलताना कर्जमाफीबद्धल भुमिका स्पष्ट करताना ‘आपण करत असलेही कर्जमाफी ऐतिहासीक असून,  36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे’, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.  तसेच, कर्जमाफीचा गैरफायदा रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. (हे पण पाहा: समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे दर जाहीर, एका एकरासाठी 50 लाख रुपये)

दरम्यान, शंभर टक्के शेतीवर उपजीवीका असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी हा निकष लावल्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.