मुंबई: आमदार नितेश राणेंवर धमकावून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात ला आहे. शुक्रवारी पहाटे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या दोन सहका-यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोप जुहुतील एका रेंस्टॉरंट मालकानी केला होता. रेस्टॉरंट मालकाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता पर्यंत रेस्टॉरंट मालकानं आरोप केला आहे की नितेश राणे त्यांना दर महिन्याला दहा लाख रुपये मागायचा. आतापर्यंत त्यांनी 50 लाखांची खंडणी दिल्याचा आरोप केला हे. हॉटेलमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार जुहू रोड परिसरात ऑक्टोबर 2016 मध्ये निखिल मिराणी आणि हितेश केसवानी यांनी एस्टेला नावाचं हॉटेल सुरू केलं. त्यानंतर नितेश राणे यांनी त्या दोघांसमोर हॉटेलमध्ये भागीदारीचा प्रस्ताव ठेवला. मात्र, हॉटेल सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याने दोघांनीही हा प्रस्ताव नाकारला.

प्रस्ताव नाकारल्यानंतरही राणेंनी त्यांच्याकडे भागीदारीसाठी तगादा सुरूच ठेवला. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नितेश राणे यांनी त्यांना पुन्हा भागीदारीसाठी विचारले. मात्र, दोघांनीही नकार दिल्यावर राणेंनी त्यांना हॉटेल बंद करण्याची धमकी दिली, तेव्हा राणेंनी त्यांना हॉटेल बंद करण्याची धमकी दिल्याचा आरोप हितेश केसवानी यांनी केला आहे.

त्याच दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास दोघे जण हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी हॉटेलमध्ये असलेल्या ग्राहकांना धक्काबुकी करत बाहेर काढण्यास सुरुवात केली. तेव्हा सुमारे 60 ग्राहक हॉटेलमध्ये होते. राजकीय नेत्याच्या नावाने दोघे जण हॉटेलमध्ये तोडफोड करत असल्याची माहिती हॉटेल मालक केसवानी, मिराणी यांना मिळाली. त्यांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली.

या प्रकरणी नितेश राणेंचे सहकारी मोईन शेख आणि मोहम्मद अंसारी यांना अटक केली आहे. या प्रकरणी नितेश राणे म्हणाले की हितेश केशवानी हे माझे चांगले मित्र असून या प्रकरणाला चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात आल्यानं गैरसमज निर्माण झाला आहे. तरी देखील शनिवारी सर्व गैरसमज दूर होऊन हे प्रकरण थांबेल. या प्रकरणी नितेश राणेंना लवकरच अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रवक्त्या रश्मी करंदीकर यांनी दिली.