मुंबईतील फोर्ट परिसरातील जे. के. सोमानी या इमारतीला काल रात्री आग लागली. इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आग रात्री ९.३0 च्या दरम्यान जे.के. सोमानी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील एका कार्यालयापासून सुरू झाली.” आगीने भीषण रूप धारण केल्याने  आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २० गाड्या आणि १६ पाण्याचे टँक रवाना करण्यात आले आहेत. या आगीत कोणत्याही स्वरूपाची जीवित हानी झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही.