पुणे :  पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रोहित टिळक यांच्याविरोधात सोमवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित टिळक यांनी आपल्याला धमकावून बलात्कार केला असल्याचे तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

या संदर्भात टिळक यांच्याविरुद्ध एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या संदर्भात बलात्कार, धमकावणे आदी गुन्हे सोमवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टीळकांचा पणतु, विधान परिषदेचे माजी सभापती जयंतराव टीळकांचा नातु व टीळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु दिपक टीळक यांचे पुत्र म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांच्यावर भारतीय दंड विधान ३७६, ३७७, ३२३, ५०४, ५०६, ५०७ कलमां अण्वे विश्राम बाग पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार महिलेने यापूर्वी टिळक यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याबाबतचे पत्रही तिने पोलिसांना दिले होते. पण ऐनवेळी काही कारणांमुळे तिला त्यावेळी आंदोलन करता आले नाही. हे कारण अद्याप पुढे आले नाही. तसेचया महिलेने पत्रकार परिषद घेऊन तिची बाजू मांडण्याचाही प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे. मात्र ही पत्रकार परिषद झाली नाही. या महिलेवर दबाव असल्याची चर्चा आहे.