गोल्डमॅन म्हटलं की आपल्याला आठवतात ते दत्तात्रय फुगे. यांची जुलै महिन्यात हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर भरपूर सोनं घालणं किती धोक्याचं असतं याचा धसकाच घेतला मात्र कानपूरमध्ये सध्या एका नव्या गोल्डमॅनची चर्चा रंगली आहे. पायात पाच किलो चांदीचे बुट आण सोन्याची पिस्तुल सोबत बाळगणा-या कानपूरमधल्या नव्या ‘गोल्डमॅनचं वैशिष्ट्य. कानपूरमधल्या काकादेव येथे राहणारे मनोज सिंह हे तिथले ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळखले जातात.

Golden man 1

आपल्या सोन्या चांदीच्या आभुषणांशिवाय ते घराबाहेर पडतच नाही. जवळपास १० किलोंच्यावर सोन्या -चांदीचे दागिने घालून ते घराबाहेर पडतात. मनोज सिंह हे सोन्याचे व्यापारी आहे. त्यांच्या कुटुंबियांबद्दलही अशा अनेक गोष्टी ऐकिवात आहे. त्यांचे वडिल सोन्याची सायकल चालवायचे तर सोन्याच्या ताटातच जेवायचे अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल ऐकण्यात आहेत. त्यामुळे, वयाच्या १५ व्या वर्षांपासूनच  आपण सोन्याचे दाग-दागिने घालायला सुरुवात केली असे ते सांगतात. या गोल्डमॅनच्या श्रीमंतीचे चर्चे इतके आहेत की ते घरात ते अर्ध्या किलो सोन्याने मढवलेली चप्पल घालतात. तर ज्या खुर्चीवर बसून ते जेवतात ती खुर्चीही चार किलो चांदी आणि अर्धा किलो सोने वापरून बनवण्यात आली आहे. गळ्यात अडीच किलोची सोन्याची चेन आणि इतर दागदागिने घालून फिरणा-या मनोजला पाहायला अनेक जण गर्दी करतात. इतकेच नाही तर ते खिश्यात सोन्याची बंदुकही बाळगतात.

goldn-man-

मनोज यांचे एकदा अपहरणही करण्यात आले होते. परंतु पोलिसांनी या अपहरणकर्त्यांना वेळीच अटक केली. या प्रसंगापासून मनोज यांनी आपल्या सुरक्षेसाठी चार बंदुकधारी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर हेच मनोज कुमार सध्या देशातून काळा पैसा बाहेर काढण्याच्या बाता करत आहे. याच वर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्रातल्या गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणा-या दत्तात्रय फुगे यांची हत्या करण्यात आली होती. सोन्याचे अलंकार घालून फिरणारे दत्तात्रय फुगे हे चर्चेत होते. त्यानंतर त्यांनी साडेतीन किलो वजनाचा शर्ट स्वत:साठी तयार करून घेतला होता. या शर्टची किंमत १ कोटींहूनही अधिक होती. त्यांच्या हत्येनंतर हा शर्ट गायब झाला आहे.