मुंबई :  एकदा हवेत उड्डाण केलेल विमान खुपच एमर्जंसी असेल तर खाली उतरविले जाते. पण  विमान प्रवासादरम्यान बाळाचा जन्म झाल्याने जेट एअरवेजचे विमान मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. प्रसुती झालेल्या या महिलेचे नाव काय हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र विमान प्रवास आणि बाळाचा जन्म त्याच्या आईसोबत सहप्रवाशांचाही चांगलाच स्मरणात राहील.

सौदी अरेबियातल्या दमाममधून जेट एअरवेजचे बोईंग ७३७ हे विमान १६२ प्रवाशांना घेऊन कोचीला निघाले. या विमानाने उड्डाण केले, ते कोचीच्या दिशेने निघाले. मात्र एका महिलेला मुदतपूर्व प्रसूती कळा सुरू झाल्या. त्या विमानातून प्रवास करणारे प्रवासी अचानक भांबावून गेले.  विमानातील कर्मचाऱ्यांनाही अशावेळी काय करावे ते सुचत नव्हते. त्यानंतर लगेचच वैमानिकांनी हे विमान मुंबईला वळवण्याचा निर्णय घेतला. (एअर इंडियाची ‘सावन स्पेशल’ ऑफर, 706 रूपयांत मिळवा विमानाचं तिकीट)

यानंतर विमानतल्या प्रशिक्षित मेडिकल स्टाफने ३५ हजार फूट उंचीवर असताना या महिलेची यशस्वी प्रसुती केली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, या महिलेने गुटगुटीत बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्माची आनंदाची बातमी ऐकून विमानातील प्रवासी आनंदित झाले. काही निवडक प्रवासी वगळता बाकिच्यांनी बाळाच्या जन्मात आनंद मानला. (विमानाने देशात कुठेही फिरा केवळ 899 रूपयांत, इंडिगोची मान्सून स्पेशल ऑफर)

दोघांची प्रकृती स्थिर

मुंबईत विमान आल्यावर या महिलेला आणि तिच्या बाळाला होली स्पिरीट रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळ आणि त्याची आई दोघांची प्रकृती चांगली आहे अशी माहिती समोर येते आहे.

जेट एअरवेजचा आयुष्यभराचा मोफत प्रवास

या बाळाला जेट एअरवेजने आयुष्यभराचा मोफत केला असून तसा पासही भेट दिला आहे. त्यामुळे आता या बाळाला जेट एअरवेजने प्रवास आयुष्यभरासाठी मोफत आहे.