मुंबई – अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज तसेच भारतीय रेल्वेचा वेग वाढविणारी तेजस एक्सप्रेस लवकरच रुळांवर धावणार आहे आणि ते म्हणजे आपल्या कोकणात. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच स्वयंचलित दरवाजे आणि गँग वे अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असलेली ‘तेजस एक्स्प्रेस’ 22 मेपासून कोकणात धावणार आहे. ऑटोमॅटिक डोर क्लोझिंग आणि सर्वच डबे आतून जोडलेली ही भारतातील पहिली एक्सप्रेस ट्रेन आहे. (तेजस एक्सप्रेसचे फोटोज पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

‘तेजस एक्स्प्रेस’ मुंबई-गोवा मार्गावर धावणार असून विमानाप्रमाणे आसनांमागे एलईडी स्क्रिन, चहा-कॉफीचे व्हेंडिंग मशीन्स, सीसीटीव्ही सारख्या अत्याधुनिक व्यवस्था या ट्रेनमध्ये असणार आहेत. रेल्वे अर्थसंकल्पात सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासासाठी अत्याधुनिक अशा ‘तेजस’, ‘अंत्योदय’ आणि ‘उदय’ एक्स्प्रेस गाड्यांची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. त्यानंतर आता तेजस एक्सप्रेस रुळांवर धावणार आहे.

Tejas-Train- (2)

सीएसएमटी स्टेशनवरुन सोमवारी सुरेश प्रभू या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील. सीएसएमटी स्टेशनवरुन प्रायोगिक तत्त्वावर (करमाळी) गोवासाठी ही ट्रेन 22 मे रोजी कोकणात रवाना केली जाणार आहे. तेजस एक नवीन प्रीमियर क्लास ट्रेन असून प्रवाशांचा प्रवास अधिकाधिक आरामदायक करणं हा यामागचा मुख्य हेतू आहे. तेजस एक्स्प्रेस सर्वात आधी मुंबई आणि गोव्यात धावेल. त्यानंतर मुंबई-अहमदाबाद, आनंद विहार-लखनौ आणि दिल्ली-चंदीगडमध्ये चालवण्यात येईल.

Tejas-Train- (23)

तेजस एक्स्प्रेसची वैशिष्ट्ये:

 • 200 किमी प्रतितास वेगाने धावणारी तेजस ही देशातील पहिली ट्रेन
 • ही ट्रेन 8 तास 25 मिनिटांत मुंबई ते गोवा अंतर कापणार
 • तेजस एक्स्प्रेसचा प्रत्येक डब्बा बनवण्यासाठई रेल्वेला 3 कोटी 25 लाख रुपये खर्च करावे लागले
 • ही ट्रेन आठवड्यातील पाच दिवस धावणार
 • या ट्रेनला एकूण 7 थांबे आहेत
 • बायो व्हॅक्युम प्रसाधनगृहे
 • सीसीटीव्ही कॅमे-यांनी सज्ज
 • जीपीएसवर आधारित इंडिकेटर
 • वाय-फायची सुविधा
 • स्वंयचलित पद्धतीचे प्रवेशद्वार
 • टॉयलेटवर यंगेजमेंट डिस्प्ले बोर्ड
 • वॉटर लेव्हल इंडिकेटर्स
 • प्रवाशांसाठी मॅगझिन आणि स्नॅक टेबल
 • सेन्सर्ड टॅप आणि हॅण्ड ड्रायर्सची सोय
 • एक्झिक्युटीव्ह क्लास आणि चेअर कार
 • राजधानीसारखी कॅटरिंग सर्व्हिस
 • फायर फायटिंग उपकरणे

tejas express

ट्रेनचे वेळापत्रक

पावसाळ्यातील वेळापत्रक

वार – सोमवार, बुधवार, शनिवार

सीएसएमटी – पहाटे 5.00 वाजता

करमाळी – दुपारी 3.40 वाजता

Tejas-Train- (15)

परतीचा प्रवास

वार – मंगळवार, गुरुवार, रविवार

करमाळी – दुपारी 2.30 वाजता

सीएसएमटी – रात्री 11 वाजता

Tejas-Train- (21)

पावसाळा वगळता

वार – बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार

सीएसएमटी – पहाटे 5 वाजता

करमाळी – दुपारी 1.30 वाजता

Tejas-Train- (30)

परतीचा प्रवास

करमाळी – दुपारी 2.30 वाजता

सीएसएमटी – रात्री 11 वाजता

Tejas-Train- (18)

तेजसचे थांबे

 • सीएसएमटी
 • दादर
 • ठाणे
 • पनवेल
 • रत्नागिरी
 • कुडाळ
 • करमाळी