मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा पहिला टप्पा नुकताच पार पडला असून त्यानंतर होणा-या महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात मुंबई महानगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याची सर्वात जास्त चर्चा रंगली आहे. अशातच ही मुंबईसह राज्यातील ९ महानगरपालिकांची निवडणुक मार्च २०१७ मध्ये पार पडणार असल्याची माहिती महाराष्ट्र निवडणुक आयोगाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

लोकमतने दिलेल्या माहितीनुसार, अनेक राजकीय पक्ष आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तयारी लागले असतानाच पुढील वर्षी मार्चमध्ये मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर ९ महानगरपालिकेच्या निवडणूका होणार आहेत. निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये. राज्य निवडणूक आयोग लवकरच ती जाहीर करेल.

कोकण विभागातील मुंबई आणि ठाणे महानगरपालिका, पुणे विभागात पुणे पिंपरी चिंचवड आणि सोलापूर महानगरपालिका, नाशिक विभागात नाशिक महानगरपालिका, अमरावती विभागमध्ये अमरावती आणि अकोला महानगरपालिका तर नागपूर विभागात नागपूर महानगरपालिकेची निवडूक मार्च २०१७ मध्ये होणार आहे.