काँग्रेसच्या २२ नगरसेवकांपैकी ८ नगरेसवक फुटले आहेत. यामुळे श्रीरामपूर नगरपालिकेत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तसेच  शिर्डीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांना देखील धक्का बसला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या पत्नीचा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे जयंत ससाणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी वेगळी गटनोंदणी केली आहे. काँग्रेसचा फुटलेला गट शहराच्या विकासासाठी समर्थन देणार आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेत सत्ता काँग्रेसची आहे, तर नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या अनुराधा अधिक आहेत. एकूण ३२ जागांपैकी काँग्रेसचे २२ नगरसेवक आहेत, तर महाआघाडीचे १० नगरसेवक आहेत.

या फुटीच्या राजकारणामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. २८ नोव्हेंबरला नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या १४७ जागांसाठी निवडणूक झाली. पहिल्या टप्प्यातील या मतदानात भाजपला कौल मिळाला होता. भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपलं स्थान धरून ठेवलं होतं.