मुंबई – ‘सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का’ या गाण्याने सध्या सर्वांनाच वेड लावलं आहे. या गाण्याने सोशल मीडियात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे याच गाण्याचा आधार घेत रेडिओ जॉकी मलिष्काने बीएमसी आणि मुंबईवर एक गाणं तयार केलं आहे. आरजे मलिष्काने गायलेल्या गाण्याचे बोल ‘मुंबई, तुला बीएमसीवर भरवसा नाय काय?’ असे आहेत.

आरजे मलिष्काने गायलेलं गाणंही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मुंबई महानगरपालिकेवर टीका करणारं हे गाणं सत्ताधारी शिवसेनेला चांगलंच खटकल्याचं दिसत आहे. त्यामुळेच शिवसेनेनेही आरजे मलिष्कावर एक गाणं तयार केलं आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

शिवसेनेने मलिष्कावर आधारित तयार केलेलं गाणं हे शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी लिहिलं आणि गाणं सादर केलं. पावसाळ्यात मुंबईत रस्त्यावरील खड्डे आणि त्यात तुंबलेले पाणी यातून मुंबईकर आपला प्रवास करत असतात. खरंतर आरजे मलिष्काने सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. मात्र, शिवसेनेला हे गाणं खटकलं आणि त्यांनी आपलं गाणं तयार केलं. पाहूयात शिवसेनेने तयार केलेलं मलिष्कावरील गाणं…

गेल्या काही दिवसांपासून सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय या गाण्यानं सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. अनेकजण याच गाण्याचा आधार घेत आपले व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट करत आहेत. यामुळेच रेडिओ जॉकी मलिष्काने मुंबईतल्या समस्या या गाण्याच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडल्या होत्या. (आरजे मलिष्काच्या ‘सोनू सॉंग’ च्या अनोख्या व्हर्जनने बीएमसीची पोलखोल (व्हिडिओ)

तसं पहायला गेलं तर आरजे मलिष्काने गायलेल्या तिच्या गाण्यात शिवसेनेच्या नावाचा उल्लेखही केलेला नाहीये. मात्र, तरीही शिवसेनाने मलिष्कावर टीका करत गाण तयार केलं आहे.