नवी मुंबई: वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्त करत अल्पवयीन मुलीवर बालात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील कौपरखेरणे येथून गेले तीन दिवस एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. दरम्यान, तीन दिवसांनतर घरी परत आल्यावर पीडितेने आपल्या आईला याबाबत माहिती दिली. पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधीत तरूणाव पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर, मुलीला पीडितेला सोबत घेऊन गेलेल्या मुलीलाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, कोपरखैरनेतील 16 वर्षीय मुलीला (पीडिता) शेजारीच राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरूणीने वाढदिवसाच्या पार्टीला जायचे असून तिला सोबत येण्यासाठी तयार केले. ही तरूणी पीडितेला घेऊन उरणला गेली. पण तीन दिवस झाले तरी ती मुलगी घरी आली नव्हती म्हणून पिडीत मुलीच्या आईनो पोलिसात तक्रार दाखल केली.

तीन दिवसानंतर पिडीत तरुणी घरी परतल्यानंतर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. शेजारील तरुणीने आपल्याला फूस लावून उरण येथे नेल्याचे तसेच तेथे गेल्यानंतर एका तरुणाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले. त्यामुळे या मुलीच्या आईने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार केली.

कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणी संबंधित तरुणावर बलात्कार तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या मुलीला फूस लावून नेणा-या तिच्या शेजारच्या तरुणीलाही या गुह्यात सहआरोपी केले आहे.