मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या सभेत गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती आहे. मुंबईतील जामा मस्जिद परिसरात त्यांची सभा होती. मगळवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या सभेला संजय दिना पाटील यांनाही निमंत्रण होते. मात्र, सभा सुरू असताना ते सभास्तानी आले तेव्हा, त्यांना प्रवेश करण्यास अटकाव करण्यात आला. दरम्यान, या झटापटीत अज्ञातांनी सहा ते सात राऊण्ड फायर केल्याने गोंधळ उडाला.

पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नाही. मात्र, प्राप्त माहितीनुसार, नवाब मलिक यांची सभा सुरू होती. दरम्यान काही अज्ञात व्यक्ती तलवारी आणि बंदूका घेऊन मलिक यांच्या सभास्थळी आले आणि त्यांनी गोळीबार केला. दरम्यान, या गोळीबारप्रकरणी मलिक यांनी संजय दिना पाटील यांच्यावर आरोप केला आहे. सभा सुरू असताना काही लोक तलवार आणि बंदूक घेऊन सभेत घुसले व त्यांनी गोळीबार सुरू केला. दरम्यान, एबीपी माझा वृत्तवाहिनीवर नवाब मलिक यांनी संजय दिना पाटलांच्या हातात बंदूक असल्याचे म्हटलेआहे.

दरम्यान, संजय दिना पाटील हे माजी खासदार असून, त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावरूनच खासदारकी मिळवली होती. दरम्यान, या गोळीबाराला राजकीय किनार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या प्रकरणाबद्धल अधिकृतपणे कोणीही काहीही प्रतिक्रीया दिली नाही.(हेही वााचा, कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदे पोलीस चकमकीत ठार)

संजय दिना पाटील यांचे म्हणने काय?

दरम्यान, याबाबत संजय पाटील यांच्याकडे प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता, हे आपल्याविरुद्ध रचलेले षडयंत्र असल्याचे म्हणणे आहे. आम्हाला सभेत निमंत्रण असल्याने आम्ही तेथे हजर झालो. सभेसाठी आतमध्ये प्रवेश करत असताना तेथे आम्हाला अडवून हल्ला करण्यात आला. नेमके काय झाले कळले नाही.अचानक समोरुन हातात तलवारी घेऊन घोळका जमला. अशात आम्ही  विरोध केला असता हा गोंधळ झाला. अशात आपली बाजू सावरण्यासाठी मलिक यांनी हे आरोप केले आहेत.