मुंबई- रेल्वे स्थानकात असलेल्या भिकारी आणि अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळाचा वापर करुन घतपात घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दहशतवादी संघटना घातपातासाठी लाईफलाईन असलेल्या रेल्वे मार्गाचा वापर करु पाहत आहेत हे वारंवार निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभुमीवर रेल्वे प्रशासनातर्फे खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. त्यानुसार आजपासून तीन दिवस पश्चिम रेल्वेमार्गावर कारवाईसाठी विशेष मोहीम चालवण्यात येत असल्याची माहिती आरपीएफकडून देण्यात आली.

महाराष्ट्र पोलिसांकडूनही खबरदारी घेण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत.  याचाच एक भाग म्हणून रेल्वे स्थानक हद्दीत अनधिकृत फेरीवाले व भिकारी यांना हटवण्याची सूचना करण्यात आली आहे. (रेल्वे रुळांवर हल्ल्याचा दहशतवादी संघटनेचा डाव, राज्यात अलर्ट जारी )

काय केल्या आहेत सुचना ??

रुळांची पाहणी करतानाच गस्त घालण्यात यावी.

रुळांना लागून असलेले लोखंडी तुकडेही हटविण्यात यावेत

रेल्वे स्थानक व हद्दीत अनधिकृत फेरीवाले  भिकारी यांना हटविण्यात यावे.  (मेधा लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल )

कारवाईची उघड मोहीम

या विशेष मोहिमेअंतर्गत आरपीएफकडून त्यांना हटविण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून २१ मार्चपासून तीन दिवस अनधिकृत फेरीवाले आणि भिकाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम उघडण्यात येणार आहे.

सुरक्षा दलाकडूनही रेल्वेच्या विविध विभागांना पत्र लिहून रुळांची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  (तेजस ट्रेन १ एप्रिलपासून धावणार, काय आहे वेगळेपण )

कधी आणि कुठे झाली घातपाताची प्रकरणे ??

जानेवारी महिन्यात दिवा स्थानकाजवळ तर दिवा-पनवेल मार्गावर लोखंडी वस्तू तसेच स्फोटक पदार्थ ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आला.

फेब्रुवारी महिन्यातही पनवेल-जेएनपीटी मार्गावरील जसई रेल्वे स्थानकाजवळील रुळावर लोखंडी खांब आढळला.