शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यातील दत्तवाडी परिसरातील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये ही घटना घडली आहे.  ११ वर्षाचा शिवम तुकाराम खंडाळे असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो कोथरुडला राहत होता.

शुभमखेळत असताना बॅडमिंटनचं अडकलेलं फूल काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ऑडिटोरिअमची खिडकी उघडून तो अडकलेलं फून काढायला गेला. पण त्याचवेळी तो तिसऱ्या मजल्यावरुन कोसळल्याचं समजतं. यानंतर शुभमला खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्याआधीच त्याने प्राण सोडले होते.

या घटनेने त्याच्या परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. ही घटना घडली तेव्हा शिक्षक तेथे उपस्थित नव्हते का असा सवाल विचारला जात आहे. या सर्व घटनेमुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये भितीचं वातावरण आहे.