पंजाबमधील एका क्रिडा प्रशिक्षकाने अल्पवयीन 13 मुलांचे लैंगिक शोषण केल्याची बाब नांदेडमध्ये घडली आहे. सल्विंदरसिंग असं या इसमाचे नाव असून तो पंजाबचा क्रिडा प्रशिक्षक आहे. पंजाबमधील मुलांना घेऊन हा इसम नांदेडमध्ये हजर झाला होता. या इसमानेच चोरी केल्यामुळे लैंगिक शोषणाचा प्रकार देखील उघडकीस झाला होता.

पंजाब राज्यातील सल्वींदरसिंग हा पंजाब राज्यातीलच 13 मुलांना नांदेड मध्ये क्रिकेट सामने खेळण्याच्या नावाखाली घेवून आला. यात्री निवासमध्ये 2 खोल्या घेऊन तो मागील 3 दिवसापासून नांदेडमध्ये राहिला. दरम्यान सल्विंदरसिंगला दिलेल्या खोलीच्या परिसरात कपडे चोरीला गेल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर यात्री निवास च्या सुरक्षा विभागाने सिसिटीव्ही फुटेज तपासले…यात सल्विंदरसिंग हा कपडे चोरत असल्याच दिसल.

सल्विंदरसिंगच्या खोलीची तपासणी केली असता चोरीला गेलेले कपडे सापडले. यावेळी सल्विंदरसोबत असलेल्या लहान मुलांनी सुरक्षा रक्षकांना सल्विंदर आपल्यावर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे सांगितलं. आणि या मुलांच्या तत्परतेमुळेच हा प्रकार उघडकीस झाला आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलिसात तक्रार देण्यात आली.

नांदेड शहरात कोणतेही क्रिकेट सामने सुरु नाहीत. केवळ फसवणूक करून आरोपी सल्विंदर याने एकूण 13 मुलांना पंजाब येथून नांदेडला आणलं आणि त्यातील तिघांवर अत्याचार केला आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध विविध कलामंखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.