भूतं! या शब्दाचा विचार केला तरी काही लोकांना भीती वाटते. तर काही जण मात्र अगदी मनापासून भूताचे सिनेमे पाहणं पसंद करतात. आताच प्रदर्शित झालेला लपाछपी या सिनेमाने देखील प्रेक्षकांना एक वेगळाच आनंद दिला. मराठीतील हा पहिला प्रयत्न कौतुकास्पद होता. पण या सिनेमाने गावाकडील अशा असंख्य जागा आठवून दिल्या जिथे भूतांच वास्तव्य आहे असं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे मुंबईतही अशा 20 जागा आहेत जिथे भूतांच वास्तव असल्याचं ठामपणे सांगितलं जातं. यापैकी कितीतरी जागांवर तुम्ही कायम जात असाल पण तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही. तर यातली काही ठिकाणं ही कायमच गजबजलेली असतात पण येथील एकांत हा तुमच्या अंगावर काटा उभा करू शकतो. पाहूया मुंबईतील या 20 जागा…

1

  1. डिसूझा चाळ – माहिममधील डिसुझा चाळ कुणाला माहित नाही असं नाही. कारण अनेकांचा हा लँडमार्क देखील असतो. पण ही जागा भूताच्या वास्तव्याची आहे असं देखील म्हटलं जातं.  असं म्हणतात की माहीम मध्ये अश्या विचित्र घटना होत असतात.  त्यातल्या डिसूझा चाळीबद्दल ऐकवला जाणारा किस्सा असा की, एका बाई ने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्या दिवसानंतर संध्याकाळी तिचा आत्मा या परिसरात भटकतो.

2

2.आरे कॉलनी – आरे मिल्क कॉलनी अधून मधून बिबट्यामुळे चर्चेत असते. पण इथे कायमच्या चर्चेचा विषय म्हणजे पांढऱ्या साडीतली लिफ्ट मागणारी एक बाई ! आरे कॉलनीला जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी एक बाई प्रवाश्यांना लिफ्ट मागताना दिसते असं म्हणतात. याशिवाय काहीवेळा वृध्द माणसाचा आवाज ऐकू येणं किंवा लहान मुलाचं रडणं असा प्रकार सुद्धा इथे घडला आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी इथून फिरकायला अनेकांची फाटते. आणि अनेक जण भर पावसात देखील प्रवास करण टाळतात.

3

3.मुकेश मिल्स – मुकेश मिल्स ही जागा मूळ भुतांनीच फेमस केली आहे. १८७० साली एका आगीत भस्म मिल भस्म झाली. असं म्हणतात की आगीत हजारो लोक मेले आणि त्यानंतर ही जागा कायमची बंद झाली. पण बॉलीवूडमुळे या जागेला पुन्हा उजाळा मिळाला. मिल्सचा वापर बॉलीवूडच्या फिल्म्स शूट करण्यासाठी होऊ लागला. त्यामुळे तशी ही जागा वर्दळीची  आहे.. पण अनेक फिल्म स्टार्सनी इथे काही तरी विचित्र प्रकार असल्याचं कबूल केलंय. त्यामुळे इथली शुटींग लवकरात लवकर उरकली जाते.  कारण संध्याकाळनंतर खेळ सुरु होतो म्हणे

4

4. टॉवर ऑफ सायलन्स – प्रचंड घाबरवणारी आणि भूताची जागा ओळखली जाणारी जागा म्हणजे टॉवर ऑफ सायलन्स. मलबार हिलमध्ये ही जागा आहे. अतिशय शांत असलेली ही जागा पारसी अंत्यसंस्कारासाठी वापरली जाते.

5

5. संजय गांधी नॅशनल पार्क – निसर्गाने वेढलेला आणि या भागात पुरातन गुफा असल्याने लोक संजय गांधी नॅशनल पार्कला भेटी देतात.  पण याशिवाय इथे काही विचित्र गोष्टी आहेत, ज्या खतरनाक असू शकतात. इथे एक प्रेत फिरत असल्याचं म्हटलं जातं, जे लोकांना रात्रीच्या वेळी लिफ्ट मागतं. याभागात रात्रीच्या वेळी अश्या घटना घडल्या असल्याचं म्हटलं जातं. पण काहींच्या मते ही निव्वळ एक अफवा आहे.

6

6.वृदांवन सोसायटी – वृंदावन सोसायटीमधलं भूत तुम्हाला भूतनाथची आठवण करून देईल राव. या भुताला कानाखाली मारायला जाम आवडतं. एका माणसाने इथल्या एका इमारतीतून आत्महत्या केल्यानंतर वॉचमन बरोबर इथे काही विचित्र प्रकार घडलेलेले दिसले. जर कोणता वॉचमन ड्युटीवर असताना झोपला, तर कोणी तरी येऊन वॉट्चमनच्या खाडकन कानाखाली देतं असं म्हटलं जातं. याशिवाय इथे राहणारी माणसंसुद्धा इथल्या प्रकाराबद्दल सांगत असतात.

7

7. नसरगंज वाडी – (माहिम) माहिम स्टेशनजवळ ही नसरगंज वाडी वसलेली आहे. ही वाडी मुंबईतील भूताचं वास्तव्य असलेल्या जागांमध्ये मोडली जाते. 16 वर्षापूर्वी या ठिकाणी पारसी परिसरातील नसर या व्यक्तीने जिवंत जाळून घेतलं होतं. आणि असं म्हटलं जातं की त्यांच्या मृत्यूनंतर ही व्यक्ती आपल्या जागेची काळजी घेत आहे.

8

8.रोड टू मार्वे आणि मड आयलँड – मुंबईतील सर्वात निमुळता रोड म्हणून मार्वे रोड आणि मड आयलँड ही जागा ओळखली जाते. मुंबईतील ही जागा भूताची जागा म्हणून ओळखली जाते. या जागी एक तरूण वधू दिसते असं अनेकांचं म्हणणं आहे.

9

9.मुंबई हाय कोर्ट – सुनसान जागा, निर्मनुष्य रस्ता अश्या ठिकाणी तर भूत असतं हे माहित होतं.  पण कोर्टात पण भूत असतं ? हो असतं ! मुंबई हायकोर्टात मर्डर केसचा खटला जेव्हा जेव्हा येतो,  तेव्हा असं म्हणतात की इथे एक भूत माणसांना घाबरवायला प्रगट होतं. आणि हे आजचं नाही बरं का गेल्या ३० वर्षापासूनची परंपरा आहे. पण समजा या भुताने जज्ज सायबांना केस सोडवण्यास मदत केली तर? पण तसं शक्य नाही कारण भुतांच्या परंपरेला तो काळिमा असेल राव

10

10. संत जॉन बापिस्ट चर्च, अंधेरी – 1579 साली बांधण्यात आलेलं हे संत जान बापिस्ट चर्च हे 1840 सालानंतर एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आले आहेत. या जागेत तुम्हाला एका नववधुचा आवाज ऐकू येतो. जी एखादं फोर्क साँग गाताना असते असं अनेकांकडून सांगण्यात आलं आहे.

11

11. केम्स कॉर्नर (ग्रँड पॅरडी टॉवर ) – ग्राँड पाराडी टॉवर हे मुंबईतल्या मलबार हिल मधलं बऱ्यापैकी प्रसिद्ध असलेलं ठिकाण. वासुदेव आणि तारा दलाल या वृद्ध जोडप्याने आपल्या सुनेच्या छळाला कंटाळून या बिल्डींगच्या 8 व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. त्यानंतर ७ वर्षांनी त्याच घरातील मुलाने आणि त्याच सुनेने आपल्या मुलीबरोबर त्याच पद्धतीने आत्महत्या केली. बिल्डींग मध्ये काम करणाऱ्या एका बाईने देखील उडी मारून आत्महत्या केली. बिल्डींग आत्महत्येसाठी चांगलीच प्रसिद्ध आहे. १९७६ साली बिल्डींग तयार झाल्यापासून जवळ जवळ २० आत्महत्येच्या केसेस इथे झाल्या आहेत. यामुळे ग्राँड पाराडी टॉवर चांगलाच कुप्रसिद्ध आहे.

12

12. पूनम चेंबर्स (वरळी) १९९७ साली B विंगची भिंत कोसळल्यानंतर इथे भूतांचा वावर सुरु झाला असं म्हणतात. या घटनेमध्ये जे मेले त्यांचा आत्मा इथे असल्याचं म्हटलं जातं. वॉचमनपासून ते इथे काम करणारे सर्वच याबाबत बोलताना दिसतात. दार वाजवण्याचे आवाज तसेच दारांची अपोआप होणारी उघडझाप इथे रोजचं आहे.

13

13. ताज महल हॉटेल – मुंबईतील एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या या ताज हॉटेलमध्ये देखील भूताचं वास्तव्य असल्याचं सांगितलं जातं. असं सांगितलं जातं की, हॉटेलमधील चिफ आर्किटेक्टने इथे आत्महत्या केलं असल्याचं सांगितलं जातं. या व्यक्तीचं वास्तव्य या सिनेमात असल्याचं अनेकदा सिद्ध झालं आहे.

14

14. राम सकित बिल्डिंग, पॅराडाईज सिनेमाच्या मागे, माहिम – आतापर्यंत आपण अनेकदा पाहिलं की भूताची गोष्ट सांगताना किंवा ऐकताना विहिर ही कॉमन असते. या ठिकाणी 50 वर्षाच्या एका महिलेने या ठिकाणी आत्महत्या केली आहे. आणि ही घटना 20 वर्षांपूर्वी घडलेली आहे. पण इथे राहणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक अमावास्येच्या रात्री या महिलेचा भास होतो.

15

15. ठाण्यातील बेअरिंग कंपनी – इथे तर थेट मूळ संस्थापकाचं भूत आहे राव. काही करणास्तव आम्ही या कंपनीचं नाव सांगू शकत नाही. इथे सांगितलेली कथा अशी की,  मूळ मालकाने अत्यंत कष्टाने ही कंपनी उभी केली आणि त्यांच्या जाण्यानंतर कंपनीत रात्रपाळीवर काम करणाऱ्या काही कामगारांबरोबर एक चमत्कारिक घटना घडू लागली, ती म्हणजे अशी की काम करताना एखादा कामगार डुलकी घेऊ लागला की एक अदृश्य हात येऊन त्याला कानफाडतो. हे मालकाचंच भूत असल्याचं म्हटलं जातं.  कारण काम चालू असताना कोणी झोपलेलं त्यांना चालत नव्हतं.

16

16. पवन हंस क्वाटर्स (जुहू) सलमा नामक एका तरुणीने १९८९ साली स्वतःला रॉकेलने पेटवून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण तिच्या बरोबरच जाळून राख झालं. पण त्या भागातल्या एका पिंपळाच्या झाडा जवळ ती आजही जळणाऱ्या अवस्थेत दिसते असं स्थानिक लोक सांगत असतात. तिच्या भीतीने ‘अँथनी डिसूझा’ या ख्रिश्चन माणसाने तिथे एक हनुमानाचे मंदिर उभारले. तो सांगतो त्याप्रमाणे मंदिर बांधण्याची कल्पना त्याला स्वप्नात आली.  पण मंदिर बांधण्यानेही भूत काही गेलं नाही बुवा. ती अजूनही पेटलेल्या अवस्थेत येते आणि पिंपळाच्या झाडात गडप होते.