जगभरातील हुकूमशहांचा विषय जेव्हा येतो तेव्हा, जर्मनीच्या हिटलरचे नाव सर्वात हिटलरचे नाव अग्रक्रमावर असते. त्यानंतर नाव येते मुसोलीनीचे मग कर्नल गद्दाफी, सद्दाम वैगेरे वैगेरे. लोकांना असे वाटते की, या हुकूंमशहांइतके कोणीच भयानक असून शकत नाही. पण, या हुकूमशहांपेक्षाही भयानक हुकूमशाहा या जगात होऊन गेला. त्याचे नाव ईदी अमीन. ईदी अमीन हा युगांडाचा हुकूमशहा होता. देशाचे राष्ट्रपतीपद भुषवलेल्या या हुकूमशहाने देशातील जनतेचे मांस खायलाही मागेपूढे पाहिले नाही. अनेक स्त्रीयांना त्याने आपल्या वासनेचे शिकार बनवले. जाणून घ्या अशा हुकूमशहाबद्धल, ज्याने आपल्या क्रूरतेने जगाला हादरवून सोडले…

आपल्या क्रूर कृत्यामुळे जगाला हदरवून सोडणारा आणि मानवी मुल्ल्यांची पायमल्ली करणारा ईदी आमीन आज या जगात नाही. पण, त्याच्या नावाची दहशत आजही कायम आहे. आजही त्याच्या क्रुरतेचे बळी ठरलेले अनेक लोक या जगात आहेत. जे ईदीची आठवणही निघाली तरी घाबरून थरथर कापतात. 19 ऑगस्ट 2003 मध्ये मृत्यू पावलेल्या या ईदी अमीनचा जन्म 1925 मध्ये कोबोको येथे झाला. ईदी अमीनने लोकांवर जे अत्याचार केले त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ईदीने सैन्यप्रमुख आणि राष्ट्रपती अशा दुहेरी भूमिकेतून देशाला वेठीला धरले. सत्तापदावर असताना त्याने अछोली आणि लांगो समूहाच्या नागरीकांवर प्रचंड अत्याचार केले.

ईदीने त्याच्या क्रूरतेच्या वेडापाई 5 लाख लोकांची हत्या केली. ईदी इताक क्रूर होता की, तो मनात येईल तसे वागत असे. त्याच्या मनात आले तर तो जीवंत लोकांनाही जमीनीत गाढत असे. अमीनकढून मिळणारी कोणतीही सजा असूदेत लोक घाबरून उठायचे. काही लोक कल्पनेनेच मरण पावायचे. कारण त्याची सजा देण्याची पद्धतच तशी होती. कोणत्याही व्यक्तीला त्याने गोळी मारून, फासी देऊन मारले नाही. व्यक्तीचा पटकन प्राण जाईल अशी कोणतीच सजा तो द्यायचा नाही. त्याला लोकांना तडफडवून मारण्यात प्रचंड आवडायचे. (हेही वाचा, अबब…! ७,००० कारचा मालक आहे हा सुलतान, सोन्याचे विमान आणि कारने करतो प्रवास)

युगांडाचा हुकूमशाहा ईदी अमीन
युगांडाचा हुकूमशाहा ईदी अमीन

सुंदर स्त्रीया हे ईदी अमीनचे खास भक्ष्य असायचे. अनेक सुंदर स्त्रीयांना तो दिवसातून अनेक वेळा आपल्या वासनेचा शिक्षार बनवायचा. स्त्रीयांबद्धल तर तो इतका घाणेरडा वागायचा की, तो स्त्रीयांसोबत सेक्स करायचाच. पण, अनेक पुरूषांना तो एकाच स्त्रीवर बलात्कार करायला सांगायचा. तसेच, स्त्रीयांचे स्तन कापने त्यांना प्राण्यांसोबत सेक्स करायाला लावणे हे त्याचे आवडते उद्योग होते. त्याच्या सत्ताकाळात अऩेक धरणांमध्ये स्त्रीयांची मुंडकी आणि छिन्नविछिन्न झालेले मृतदेह सापडत असत.( अबब..१५ बायका, ३० मुलं आणि तब्बल १०० नोकरांसह भारतात आले स्वाझीलंडचे राजे )

युगांडाचा हुकूमशाहा ईदी अमीन
युगांडाचा हुकूमशाहा ईदी अमीन

माणसाचे मांस हे त्याचे आवडते खाद्य होते. त्याला जेवनात मानसाचे मांसच आवडत असे. त्यासाठी लोकांची डोकी कापून तो कितीतरी दिवस फ्रिजमध्ये ठेवत असे. त्याच्या दहशतवादाला आणि हुकूमशाहीला अवघा देश विटला होता. दरम्यान, 1979 मध्ये तंजानीया आणि अमीनविरोधातील युगांडा सेनेने त्याला विरोध केला. त्याला सत्तेवरून पायउतार केले. आपण आता मारले जाऊ असे जेव्हा त्याला वाटले तेव्हा त्याने  लीबिया आणि त्यानंतर सऊदीत पळून जाणे पसंत केले. त्याने एकदा युगांडा सोडला तो परत कधीच आला नाही. त्याचा मृत्यूही युगांडाबाहेरच झाला. त्याच्या मृत्यूनंतर लोक प्रचंड आनंद झाले. त्याच्या मृत्यूनंत लोकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.