नवी दिल्ली :  अमुक वर्षी दुनिया नष्ट होणार आहे, तमुक वर्षी जगबुडी येणार आहे अशा बातम्या आपण लहानपणापासून ऐकत आलो असू. पण यातील काहीच खर होत नाही याची प्रचितीही वारंवार आपल्याला आलेली असते. पण दरम्यान अशी अनेक संकटे येतात, नैसर्गिक आपत्ती येतात ज्यामध्ये हजारो माणसे आपला जीव गमावतात. पण भविष्यवाणी येताना अनेक उत्सुकता आणि शक्यता घेवून येते.

यूट्यूबच्या माध्यमातून आता ही भविष्यवाणी केली गेली आहे. याला अनेक लोकांची पसंती मिळत आहे. बहुतांश लोक या गोष्टीला गांभीर्याने घेत नसले तरीही अशी शक्यता नाकारता येत नाही असे म्हणणाऱ्यांची संख्याही कमी नाहीए.  या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे की ३१ मे ला भंयकर भूकंप येणार आहे. ज्यामध्ये जग संपणार आहे. या व्हिडिओला 13 ऑक्टोबर 2016 ला यूट्यूबवर अपलोड केला गेला होता. आतापर्यंत 13 लाखाहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. जगाचा अंत – 31 मे, 2017, धरतीवर होणार काही तरी मोठं ? असं नाव त्याला देण्यात आला आहे. 31 मे 2017 ला जग संपणार  असा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडियो व्हायरल होतोय. (भारतातील ‘हे’ गाव आहे जगातील आठवं आश्चर्य… कारण, येथे प्रत्येकाचीच जन्मतारीख आहे 1 जानेवारी)

कोणी दिला इशारा

स्टीफन हॉकिंग यांनी देखील इशारा दिला होता की बदलत्या वातावरणामुळे स्वतःला वाचवण्यासाठी मनुष्याला दुसरी धरती शोधली पाहिजे. 100 वर्षानंतर पृथ्वीवर लोकांचं राहणं कठिण होणार आहे. बीबीसीच्या एका डॉक्यूमेंट्री एक्पेडिशन न्यू अर्थमध्ये हॉकिंग आणि त्याचा विद्यार्थी क्रिस्टोफ गलफर्डने यांनी सांगितलं होती बाहेरच्या धरतीवर मनुष्य कसा राहू शकतो. (‘या’ बकरीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का)

त्यामुळे वेळीच मनुष्याला सावध राहिले पाहिजे असा यातून निष्कर्ष काढण्यात आला . 21 शतकात या सर्व अंधश्रद्ध मानल्या तरी याकडे आपण दुर्लक्ष करु शकत नाही.