२०१६ या वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर तुमच्या सर्वांसाठी कसा असणार आहे हे जाणून घ्या या राशीभविष्यातून. कोणत्या राशींसाठी हा महिना अतिशय उत्तम असणार आहे किंवा कोणत्या राशींच्या लोकांनी या महिन्यात अधिक काळजी घ्यायची आहे हे जाणून घ्या.

aries-horoscope-2016

मेष – मेष राशिसाठी या महिन्याची सुरूवात फार काही चांगली नाही. तुम्हाला मानसिक त्रास, निराशा जनक वातावरण या महिन्यात जाणवेल. तसेच तुम्हाला स्वास्थाची समस्या देखील जाणवेल. कारण मना सारखं काम झालं नाही तर चिडचिड होण्याची शक्यता आहे. जर शक्य असल्यास या महिन्यात नियमित शंकराची पूजा करा. तसेच चांदीची कोणतीही एक गोष्ट स्वतःजवळ ठेवा. जेणे रून तुम्हाला मानसिक त्रास कमी होईल.

महिन्यातील दुसऱ्या सप्ताहाची सुरूवात काहीशी चांगली असेल. या आठवड्यात तुमचं मन अधिर प्रफुल्लित आणि आनंदी असेल. तसेच तुमच्या जीवनसाथीसोबत फिरण्याचा योग आहे. त्याचप्रमाणे या आठवड्यात तुमच्या जीवनसाथीचे मार्गदर्शन आणि सहयोग लाभेल. तुमच्या मनात या आठवड्यात खेळाची भावना प्रगट होईल. कला, संगीत, सिनेमा यासारख्या गोष्टींमध्ये रूची निर्माण होईल.

आणि महिन्याच्या उत्तरार्धाच्या काळात कौटुंबिक कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात पार्टनरसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. १८ डिसेंबरनंतर तुम्हाला तुमच्या पाल्याच्या तब्बेतीबाबत चिंता वाटेल. आणि या महिन्या अखेरीस तुम्हाला शरिरातील शक्ती कमी झाल्याचा भास होईल. त्याचप्रमाणे प्रिय व्यक्तीसोबत मतभेद होण्याची दाट शक्यता आहे.

taurus-horoscope-2016

वृषभ – या महिन्याचा सुरूवातीचा वेळ अगदी आनंदी, उत्साह आणि रोमांसमध्ये घालवाल. तुमच्या भागोदयासाठी हा योग्य काळ आहे. फिरण्यात आणि मजा, मस्ती करण्यासाठी अधिक व्यस्त असल्यामुळे तुम्ही कामाकडे दुर्लक्ष कराल. तसेच तुम्ही अपोझिशन सेक्सकडे आकर्षित व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांना बॉसपासून खतरा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपलं काम वेळेत पूर्ण करावं. तुमच्या राशीत सूर्य आठव्या स्थानात असल्यामुळे स्वास्थाची समस्या जाणवेल.

कार्यक्षेत्रात तुम्ही महत्वपूर्ण निर्णय घ्या. जो निर्णय भविष्यात तुमच्यासाठी अधिक लाभदायक असेल. तसेच या महिन्यात अनेक धार्मिक यात्रा किंवा पूजेचा योग आहे. तसेच जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी चांगला अभ्यासाचा योग आहे. तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीमध्ये चांगले कार्य घडेल. तसेच नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम आहे. या महिन्यात बिझनेस, नोकरी आणि तुमच्या जीवनात विचार करून निर्णय घ्या.

gemini-horoscope-2016

मिथुन – या महिन्याची सुरूवात अगदी सहज सुरू होणार नाही. तुम्हाला तुमच्या रागावर नियमंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसेच अचानक धन प्राप्ती होण्याची देखील दाट शक्यता आहे. पूर्वी पासून अडकलेला कौटुंबिक वारसा तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे.

जी व्यक्ती गूढ विद्या, ज्योतिषी किंवा कर्मकांडात रूची ठेवणारी असेल तर त्यांना नवीन काही तरी शिकण्याची संधी आहे. आर्थिक लाभासोबतच तुम्हाला परिवाराकडून सूख आणि शांती मिळणार आहे. महिन्याच्या मध्यावर सूर्य धनू राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यावेळी तुमच्या जीवनसाथीसोबत खटके उडण्याची शक्यता आहे. तुमच्या नात्यात उतार चढाव येतील. १२ आणि १३ तारखेला अनावश्यक खर्च आणि संकट येण्याची शक्यता आहे.

जीवनसाथी सोबत उडणारे खटके तुम्हाला त्रास देऊ शकतात. उत्तराधार्त बुध वक्रीस्थानी असल्यामुळे घर आणि गाडीला घेऊन थोडी चिंता असणार आहे. तसेच या महिन्याच्या सुरूवातीलाच कोणताही निर्णय विचार न करता घेऊ नये. यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. भावा – बहिणीच्या नात्यात देखील या महिन्यात मतभेद होतील. परदेशात जाण्याचा विचार असेल किंवा त्या विचाराने काही कृती करणार असाल तर थोडा विचार करा. अडथळ्याची शक्यता आहे.

cancer-horoscope-2016

कर्क – या महिन्याच्या सुरूवातीला तुमचा राग अधिक असेल. वडिलांसोबत खटके उडण्याची शक्यता आहे. स्वास्थाशी संबंधित आजार अचानक डोकं वर करतील. तसेच तुमच्यासोबतच जोडीदाराची स्वास्थाची चिंता देखील तुम्हाला सतावत राहील. मात्र नवीन नोकरीचा विचार करत असाल तर नक्की करा. तुम्हाला हा महिना चांगला आहे. आठव्या स्थानात मंगळ असल्यामुळे अचानक काही तरी लागण्याची शक्यता आहे. आणि या आजारपणात एखाद ऑपरेशन देखील होण्याची शक्यता आहे.

या दिवसांमध्ये तुम्ही व्यवसायात काही नवीन करू नका. तसेच नोकरीमध्ये तुम्हाला बॉसकडून त्रास होण्याची शक्यता आहे. १४ आणि १५ तारखेला अचानकपणे अनेक खर्च होण्याची शक्यता आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे या महिन्यात परदेशी किंवा दूर फिरण्याचा योग आहे. १७ आणि १८ तारखेला थोडा त्रास होईल.

leo-horoscope-2016

सिंह – या महिन्यात विद्यार्थ्यांसाठी अधिक उत्तम काळ आहे. या महिन्यात एकाग्रतेची अधिक शक्यता आहे. नोकरीमध्ये नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. किंवा परदेशात जाण्याचा योग जुळून येऊ शकतो. तुम्हाला कुठून तरी चांगला पैसा किंवा उत्तम पारितोषिक मिळण्याची दाट शक्यता आहे. या महिन्यात तुमच्या शत्रूंच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही कामात दिरंगाई करू नका. यामुळे तुम्हाला त्रास होईल.

तुम्हाला या महिन्यात काही लोन हवा असेल तर ते मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यारार आणि कमाईमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून पाऊल उचला. या महिन्यातील शेवटचा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. यावेळी परिक्षांचा निकाल नक्कीच चांगला लागेल.

येणारा पुढील काळ जोडदारासोबत संबंध ठेवताना तणावाचे असणार आहे. आणि हीच स्थिती तुमच्या दुखाचं कारण असणार आहे. शक्य असल्यास मंगळवारी उपवास करा. आणि शुक्रवारी लहान मुलांनी काही तरी गोड खायला द्या.

virgo-horoscope-2016

कन्या – महिन्याच्या सुरूवातीला तुम्हाला तुमच्या रागाव नियंत्रण ठेवावं लागेल. अनेक कार्यात विलंब निर्माण होईल किंवा इच्छेप्रमाणे फळ मिळणार नाही. पगार आणि उधारीसंदर्भात चांगल्या गोष्टी घडतील. कुठेतरी अडकेला पैसा लवकरच प्राप्त होईल. तुम्हाला या महिन्यात अधिक प्रमाणात बैचेनी आणि अशांती जाणवेल.

शत्रूवर विजय मिळविण्यासाठी हा अतिशय महत्वाचा महिना आहे. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी या महिन्यात अधिक मेहनत घ्यावी लागेल. बिझनेस आणि कामात उत्तम काम करण्यासाठी चांगले कर्मचारी मिळतील. नोकरांकडून आनंद देणाऱ्या गोष्टी घडतील. घाईगडबडीत किंवा वैचारीक दृष्टीकोनातून कोणताही निर्णय घेऊ नका. याचा तुम्हाला त्रास होण्याची दाट शक्यता आहे.

libra-horoscope-2016

तूळ – या महिन्याच्या सुरूवातीला अविवाहित व्यक्तींना अधिक लाभ होणार आहे. योग्य जोडीदाराची शोध आता संपणार आहे. किंवा जर कुणासोबत प्रेम संबंध असल्यास तुम्हाला लग्नाचा योग जुळून येणार आहे. मात्र नवीन प्रेम संबंध जोडण्यास मात्र हा योग्य काळ नाही. नुकतच सुरू झालेल्या प्रेमप्रकरणात वाद होण्याची शक्यता आहे.

पती – पत्नीच्या संबंधात मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच बिझनेसमध्ये भागीदार असलेल्या व्यक्तीसोबत संबंध अधिक सुधारतील. पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये डोळे आणि हड्डीची समस्या निर्माण होईल. मानसिक अशांती जाणवण्याची दाट शक्यता आहे.

दुसऱ्या आठवड्यात लोनची वाट पाहात असाल तर तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. कोर्टात जर एखादा खटला असेल तर त्याचा निकाल सकारात्मक लागण्याची दाट शक्यता आहे. सार्वजनिक जीवनात देखील सन्मान मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. अभ्यासक्रम अर्धवटच सोडावा लागेल.

scorpio-horoscope-2016

वृश्चिक – महिन्याच्या पहिल्या आठवड्यादरम्यान तुम्हाला वैवाहिक जीवनात प्रेम प्राप्त होऊ शकेल. छोट्या बहिण – भावंडांसाठी हा महिना अनेक योग घेऊन येऊ शकतो. या महिन्यात कोणत्या तरी नवीन धंद्याची सुरूवात होऊ शकते. जेवढं शक्य असेल तेवढ्या नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

या महिन्यात महिलांकडे अधिक आकर्षित होण्याची दाट शक्यता आहे. तसेच व्याज, कमिशन, बँकिंग, ज्वेलर्स यासारखे व्यवसाय अधिक चांगले चालण्याची शक्यता आहे. जे लोक लेखन, साहित्य, प्रकाशन या गोष्टींशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी हा सकारात्मक महिना आहे. कुटुंबात विवाद आणि अशांती निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबाला सोडून दूर कुठे एकांतात राहायला जाण्याची देखील इच्छा होऊ शकते.

या महिन्याच्या उत्तरार्धात अचानक नकारात्मक विचार आणि संकटांचा सामना करावा लागणार आहे. याचा त्रास नोकरीवर होऊ शकतो. नवीन नोकरी सोडावी लागण्याची दाट शक्यता आहे. जीवनसाथीसोबत छोटे – मोठे वाद होण्याची दाट शक्यता आहे.

sagittarius-horoscope-2016

धनू – या महिन्याच्या सुरूवातीपासूनच सावधान राहा. या महिन्यात तुमची मेहनत फुकट जाऊ नये म्हणून प्रयत्नशील राहा. प्रतिस्पर्धी किंवा तुमचे शत्रू तुम्हाला अधिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तसेच या महिन्यात काही तरी नवीन विकत घेण्याचा योग येणार आहे. व्यापारमध्ये एक सृजनात्मक विचार येईल. घरात शुभ प्रसंगाचे आयोजन होईल. तुमच्या कामात किंवा जबाबदारीमध्ये बदल निर्माण होतील. हा महिना तुमच्यासाठी शुभ, अशुभ असण्याची संभावना आहे,

भावा – बहिणीच्या आरोग्यात थोडा त्रास जाणवेल. तसेच संबंधांमध्ये तणाव देखील जाणवू शकतो. नवीन कार्य काही करायला जाल तर त्यामध्ये नुकसान असण्याची देखील दाट शक्यता आहे. महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या प्रेम संबंधांमध्ये समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

प्रेमसंबंधात समस्या निर्माण होईल. विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच तुमच्या मुलाला भेटणं आणि अचानक त्याच्यापासून लांब जाण्याचा योग येईल.

capricorn-horoscope-2016

मकर – महिन्याच्या पूर्वार्धात तुम्ही विशेष व्यक्तींसमोर प्रेमाचा प्रस्ताव रखाल. ज्यांचे पहिल्यापासूनच प्रेमाचे संबंध सुरू असतील त्यांचे प्रेमाबाबत कुटुंबियांना कळेल. त्यामुळे यावेळी तुम्ही तुमच्या चिभेवर ताबा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.. तसेच सेल्स आणि मार्केटिंगसोबत जोडलेल्या व्यक्तींनी विशेष विनम्रता ठेवणं गरजेचं आहे. सरकारी कामाशी निगडीत असलेल्या लोकांनी सावधानी सांभाळावी लागेल.

तसेच या दिवसांत आईशी तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. आपल्या मुलांच्या आवडीच्या गोष्टी करायच्या. स्वास्थाचा विशेष ध्यान ठेवावा. महिन्याच्या उत्तरार्धात जीवनसाथीचा व्यवहार अगदी चांगला असेल. वैवाहिक जीवनात बऱ्याच प्रमाणात शांतता येईल, नोकरीमध्ये नवीन जॉब शोधत असणाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे.

कुंभ – महिन्याच्या पूर्वार्धात जीवनसाथी सोबत एक आत्मियता वाढेल. प्रेम संबंधांसाठी हा वेळ अतिशय अनुकूल आहे. या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत डेटवर जाण्याचा प्लान कराल. याबोरबरच स्वतःच्या तब्बेतीची देखील काळजी घ्या. कारण या महिन्यात स्वभावात थोडा चिडचिडपणा देखील वाढण्याची शक्यता आहे. कारण तुमचे विचार उच्च असल्यामुळे तुम्ही समोरच्या तुमचे विचार पटवून देण्यात समर्थ असता.

धार्मिक गोष्टींमध्ये रूचि ठेवणाऱ्यांना हा महिना अतिशय योग्य काळ आहे. पूजा अर्चा आणि सत्संगात या महिन्यात अधिक रूची असते. त्यामध्ये तुमची साहायिकता वाढेल. नवीन कार्य सुरू करायचे असेल किंवा अॅडवेंचरमध्ये प्रवृत्ति असलेल्या लोकांना याचा लाभ होईल. नोकरीमध्ये टारगेट पूर्ण होऊ शकतात. त्याचप्रमाणे विशेषरुपमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन – या महिन्याच्या सुरूवातीलाच तुम्ही नोकरी किंवा व्यापारात अत्यंत महत्वाचे निर्णय घ्याल. बिझनेसमध्ये तुम्हाला जोडीदाराकडून भरपूर प्रमाणात मदत होईल. अविवाहित लोकांचे लग्न जमण्याचे किंवा प्रेम विवाहाचे सुत जुळण्याचा हा काळ आहे. तसेच प्रेम विवाहाचा देखील काळ आहे. त्यामुळे ज्यांना एखादी मुलगी किंवा मुलगा आवडत असेल तर त्यांनी तसं समोरच्या व्यक्तीला सांगावं. तसेच सासरच्या लोकांकडून धन लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

Image Credit : 123newyear.com