आज २ डिसेंबर २०१६. आज तुमच्या भविष्यात काय आहे. तुमचे तारे योग्य दिशेत आहेत की, फिरलेले आहेत. यावरून ठरतं तुमचं भविष्य…जाणून घ्या तुमचं भविष्य आणि होणा-या अनर्थाला टाळा…..

aries-horoscope-2016

मेष : आज आपण आपला संताप काबूत ठेवा असे श्रीगणेश सांगतात. कोणत्याही कामात व्यत्यय यायला हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव जाणवेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही. एखाद्या धार्मिक वा मंगल प्रसंगाला हजेरी लावाल. तीर्थाटनाला जाऊ शकता. नोकरीच्या ठिकाणी आणि कुटुंबात मतभेद होतील.

taurus-horoscope-2016

वृषभ : कायपूर्तीला विलंब आणि शारीरिक अस्वास्थ्य यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा बोझा वाढेल त्यामुळे मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. नवे काम आज सुरू न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. ध्यान धारणेने मानसिक स्वास्थ्य मिळवू शकाल.

gemini-horoscope-2016

मिथुन : शारीरिक आणि मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र आणि कुटुंबीयां समवेत प्रवास किंवा पार्टीचाबेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन आणि वाहनसुख मिळेल. भिन्नलिंगीय व्यक्तीबाबत आकर्षण वाटेल.

cancer-horoscope-2016

कर्क : श्रीगणेश कृपेने आज आपणाला यशाचा आणि आनंदाचा दिवस जाईल. कुटुंबातील व्यक्तीं समवेत घरात सुख- समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्री वर्गांशी आनंदी बातचीत कराल. आपल्या अधीन असणार्‍या व्यक्ती आणि सहकारी यांचे उत्तम सहकार्य मिळेल. तब्बेत चांगली राहील.

leo-horoscope-2016

सिंह: आपल्या हक्कासाठी लढा देण्याची मानसिकता विकसित करा. व्यवहारातील डावपेच आखताना कौशल्यपणास लागेल. नव्या ओळखीत व्यवहार टाळा.

virgo-horoscope-2016

कन्या: कौटुंबिक हितासाठी प्रसन्नता जोपासण्यास प्राधान्य द्या. कार्यक्षेत्रातील वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. सामाजिक कार्यात अवरोध निर्माण राहिल.

libra-horoscope-2016

वृश्चिक: मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. मुलांसोबतच्या वादातून मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. – एका मर्यादेनंतर स्वत:ला त्रास करुन घेऊ नका, काही गोष्टींच्या वाटेला न जाणेच श्रेयस्कर असते. प्रेम प्रकरण थोडेस कठीण असेल. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुस-या कोणालाही घेऊ देऊ नका. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिलात तर खूप मोठा बदल घडू शकतो. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करेल.

capricorn-horoscope-2016

मकर: तुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करील आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु, ही स्वत: ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. मत्सरावर मात करण्यास शिकण्यासाठी इतरांची सुख-दु:खे वाटून घ्या, त्यात सहभागी व्हा. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. चांगले दिसण्यासाठी तुम्ही जे काही बदल कराल त्यामुळे तुमच्या कुटूंबातील सदस्य वैतागतील. आपल्या प्रिय व्यक्तीमध्ये दोष शोधण्यात वेळ वाया घालवू नका. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. दुसºयांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. वैवाहिक आयुष्यात बऱ्याच मागण्या पूर्ण कराव्या लागतात, तुम्ही जर त्या पूर्ण केल्या नाहीत तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे सतर्क राहा.

 kumbh

कुंभ:आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या त-हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत – तर तुम्ही फायद्यात राहाल. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल.

sagittarius-horoscope-2016

धनु: समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुमचा आनंदीपणा नष्ट करेल. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. कामाच्या ठिकाणची परिस्थिती काहीशी विचित्र असू शकेल; सर्वजण तुमच्या विरुद्ध आहेत, असे तुम्हाला वाटू शकेल. असे वाटत असले तरी ते खरे नाही.

unnamed (3)

मीन: आपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा – मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. भागीदारी तत्त्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. सर्वांनाच चांगला फायदा होऊ शकतो. पण भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल.