बंगळुरु : सेमी फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससारख्या बलाढ्य संघाला हरविल्यानतर मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास वाढला आहे. आयपीएल सीझन 10 च्या फायनलमध्ये मुंबईचा संघ पुणे सुपरजाएंट्सना भिडणार आहे. या सीझनमध्ये पुण्याने तीनही वेळेस मुंबईच्या संघास धुळ चारली आहे. असे असले तरीही पुण्याला हरविण्यासाठी मुंबईकडे खास मास्टरप्लान तयार आहे. पण तरीही पावाची साथ कोणाला हा प्रश्न समस्त नेटकऱ्यांना पडला आहे.

Jasprit Bumrah of the Mumbai Indians is congratulated by for getting Chris Lynn's wicket. (BCCI)

गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर रोहित शर्मा व कृणाल पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या दहाव्या सत्राची अंतिम फेरी गाठताना कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान 14.3 ओव्हरमध्ये 6 विकेट्स राखून संपुष्टात आणले. विजेतेपदासाठी मुंबई रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुध्द भिडणार असून यासह यंदाच्या सत्रात चौथ्यांदा क्रिकेटप्रेमींना ‘महाराष्ट्र डर्बी’चा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

Rising Pune Supergiant's MS Dhoni played a match winning 61 off 34 innings against Sunrisers Hyderabad. (BCCI Image)

पावाची साथ कोणाला ?

मुंबई आणि पुण्याची मॅच सुरु असताना पाव कोणाला साथ देणार ? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलेली असते. पाव वड्याला साथ देणार ? की मिसळच्या सोबत जाणार ? असा खोचक प्रश्न विचारत पावाला विचारात टाकले जाते. नेटकरी मंडळी असे मेसेज फॉरवर्ड करुन पावाची अशी मज्जा घेत असतात. यामागच कारण तुम्हाला माहीत असेलच. मुंबईत वडापाव खुप फेमस आहे तर पुणेरी मिसळ पाव हा पुण्यातील प्रसिद्ध पदार्थ आहे. त्यामुळे या दोन्ही पदार्थांसोबत असणारा पाव मॅचवेळी कोणासोबत असणार असा प्रश्न विचारला जातो. मागच्या तीनही सामन्यात पावाने मिसळीचीच साथ दिल्याने वडापावप्रेमी मुंबईकर प्रचंड नाराज होते आता फायनल मॅचमध्ये तरी पाव वड्याला साथ देतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कुठे रंगणार हा झणझणीत सामना

मुंबई आणि पुण्याचा झणझणीत सामना लाईव्ह पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडिअम अॅडव्हान्स बुकींगने फुल होण्यास सुरुवात झाली आहे. रात्रो 8 वाजता याचे थेट प्रक्षेपण सुरु होईल.