एकवेळ समुद्राता थांग लागेल. मात्र, स्त्रियांच्या मनाचा थांग लागने कठीण आसे म्हटले जाते. पण, केवळ स्त्रियांच्याच मनाचा थांग लागणे कठीण असते का? तर, असे नाही. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, तारूण्य आणि प्रौढता आणि मग वृद्धापकाळ अशा अवस्थेतून जावे लागते. तेव्हा आयुष्याचा सर्वच टप्प्यांवर विचारांची प्रक्रिया सुरू असते. पण, वयाचा ठरावीक असा काळ गेला की, विचारांना स्थिरता येते. त्यावेळी मनात येणारे विचार हे जबाबदारीचे असतात. पण, जेव्हा विचारांची बांधणी पक्की झाली नसते. कारणाशीवाय मनात उधान (उनाड!) वारे वाहू लागते, असाही एक काळ असतो. या काळाला पौगंडावस्था किंवा टिन एजर्स असे म्हणतात. तर असा या वयात मुलांच्या मनात काय विचार येतात. विशेषत: मुलींच्या हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. म्हणूनच घ्या जाणून…

– आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आपण काहीतरी बनवायला पाहिजे. विशेषत: एखादा खास सण, उत्सव किंवा छोटखणी कार्यक्रम असेल तर अशा वेळी मुलींना फार उत्साह येतो. प्रत्येक वेळी मुलगी हा विचार बोलून दाखवेलच असे नाही. पण, तिच्या मनात हा विचार येतो खरा.

– या वयातील मुलींना एकट्याने खाने फारसे आवडत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी कंपनी द्यायला जर कोणी असेल तर या मुलींना विशेष आवडते.

– अनेक मुली मनात विचार करतात की, सर्वजण आपल्यालाच उपदेशाचे डोस पाजतात. आपणही कोणाला तरी सल्ला द्यायला पाहिजे. (पकवायला पाहिजे)

– आपल्याला असे कोणीतरी भेटायला पाहिजे जे, आपल्या गोष्टी ऐकेल. आपल्या सोबत आनंद शेअर करू शकेल.

– शाळा, करिअर, संस्कार या सर्वांचे ओझे पाठीवर नसते तर, किती बरे झाले असते. आपण कित्ती मजा केली असती.

–  आपल्याकडे इतका पैसा हवा की, आपल्याला आयुष्यभर काम न करता आरामात राहता आले पाहीजे.

पौगंडावस्था
पौगंडावस्था

वरिल विचारांसोबतच इतरही अनेक विचार टीनएजर्स मुलींच्या मनात येतात. अर्थात त्यातले अनेक विचार फारच फालतू असतात. पण, हे वयच असे असते की, या वयात फालतू विचार मनात नाही आले तरच नवल.