हिंदू शर्मात भगवान महादेवाची मोठा महिमा आहे. महादेवाच्या प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असते. महादेवाचं आयुष्य हे फारच जास्त कंगोरे असलेलं असल्याने त्यांच्या अपार भक्तांची श्रद्धा आहे. त्यांच्या अनेक गोष्टींपैकी एका गोष्टीची आज आपण बघुया. महादेवाच्या अंगावर भस्म का लावलं जातं ? याचं उत्तर घेऊया….

याबाबत धार्मिक मान्यता आहे की, भगवान शिव याना मॄत्यूचं स्वामी मानण्यात आलं आहे आणि शिवजी शरिर जळाल्यावर शिल्लक राहिलेली राख आपल्या शरिरावर लावतात. याप्रकारे शरिरावर भस्म किंवा राख लावून ते भक्तांना संदेश देतात की, आपलं शरिर नश्वर आहे आणि एक दिवस हे शरिर असंच मातीत मिळेल. त्यामुळे आपण शरिरावर कधीही गर्व करायला नको. कोणतीही व्यक्ती कितीही सुंदर असो मृत्यूनंतर त्यांचं शरिर असंच भस्म होतं.

* भस्म शिवाचं प्रमुख वस्त्र मानलं जातं. शिवाचं पूर्ण शरिरच भस्माने झाकलेलें असतं. सांधूंचही वस्त्र भस्मच असतं. अघोरी, सन्यासी आणि अन्य साधू हे आपल्या शरिरावर भस्म लावतात.

* शरिरावर भस्म लावण्याला एक वैज्ञानिक कारणही सांगितलं जातं. भस्म शरिरावरील रोम छिद्रांना बंद करतात. याचा मुख्य गुण आहे की, शरिरावर हे लावल्याने गर्मीत गरमी होत नाही आणि थंड दिवसात थंडी लागत नाही. त्वचा संबंधी रोगांवरही हे औषध म्हणूनही काम करतं.

* या संदर्भात आणखीही एक तर्क आहे की, भगवान शिव हे कैलाश पर्वतावर राहतात, जिथे वातावरण खूपच थंड असतं आणि त्यामुळे भस्म शरिरावर आवरणाचं काम करतं. भस्म बारीक मात्र कठोर असतं. त्यामुळे थंडी अथवा गरमी फिल होत नाही. महादेवाचं राहणीमान हे सन्यास्यासारखं होतं. सन्यासाचा अर्थच संसारापासून वेगळ्या प्रकॄतिच्या सानिध्यात राहणे.