मुंबई – घरातील वस्तू खरेदी करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. खासकरून लक्ष्मीशी संबंधित असलेल्या वस्तू. झाडू हे लक्ष्मीच्या समान असल्याचं मानलं जातं त्यामुळे झाडू खरेदी करताना काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्या-आमच्या सर्वांच्याच घरात झाडू किंवा केरसुणी असल्याचं पहायला मिळतं. मात्र, झाडू कधी मारावा, कधी खरेदी करावा यासंदर्भात खुपच कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात काही टिप्स सांगणार आहोत. चला तर मग पाहूयात काय आहेत या टिप्स…

आपल्या घरात लक्ष्मी टिकून रहावी आणि सुख-समृद्धी रहावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. लक्ष्मी स्थिर कशी होईल हे माहिती असायला हवे. चंचल लक्ष्मी घरात रहाण्यासाठी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत त्या वापरल्यास पैशाची समस्या सुटू शकते. (हे पण पाहा: तुमच्या घरात नेहमी राहील पैसा, जर तुम्ही घरात ठेवल्या ‘या’ 7 वस्तू)

  • हिंदू धर्मामध्ये झाडूला लक्ष्मी समान मानलं जातं. झाडू घरामध्ये, ऑफिसमध्ये किंवा दुकानामध्ये झाडू कोणालाही दिसेल असे ठेवु नये बंद कपाटात ठेवावे असे म्हटले जाते.
  • घराच्या मुख्य दरवाज्याच्या आजुबाजुला कोठेही अस्ताव्यस्त पडलेल्या झाडू, केरसुनी, कचरापेटी हे दरवाजामध्ये प्रवेश करताना सहज दिसेल असे ठेवु नये यामुळे प्रवेशद्वारात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

(हे पण पाहा: पाकिटात ठेवा या खास गोष्टी, होईल तुम्हाला धनप्राप्ती)

  • घरामध्ये झाडू पाय लागेल अशा ठिकाणी ठेवू नये. केरसुणी व झाडूला पाय लागण्याने लक्ष्मीचा अपमान होतो.
  • जर तुम्ही नवा झाडू खरेदी करणार असाल तर तो शनिवारी खरेदी करावा. कारण, शनिवारी झाडू खरेदीसाठी खुपच चांगला आणि शुभ दिवस मानला जातो
  • झाडू दक्षिण दिशेला ठेवू नये असेही म्हटलं जात
  • केरसुणी व झाडू कधीही उभा ठेवू नये