मुंबई: वेस्ट इंडिजचा फटकेबाज खेळाडू क्रिस गेल हा मैदानाबाहेरील त्याच्या बिनधास्तपणामुळेही नेहमीच चर्चेत असतो. क्रिस हा एक बिनधास्त, मोकळ्या स्वभावाचा खेळाडू, मनमौजी खेळाडू म्हणूनही ओळखला जातो. आता त्याने सनी लिओनीच्या गाण्यावर डान्स करून सर्वांनाच चकीत केलं आहे. त्याचा हा डान्स व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

गेलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला, ज्यात तो अभिनेत्री सनी लियॉनीच्या ‘लैला’ गाण्यावर जबरदस्त ताल धरतो आहे. या व्हिडीओमध्ये गेलच्या मागे हिरव्या रंगाचा पदडा आहे, ज्यावरुन तो जाहिरातीचं शूटिंग करत असल्याचं स्पष्ट होतं.

व्हिडीओ पोस्ट करताना गेलने लिहिलं आहे की, “जो कोणी अशाप्रकारे डान्स करेल त्याला मी 5 हजार डॉलर देणार. हे आव्हान केवळ पुरुषांनाच नाही तर महिलांनाही आहे.”

जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटरच्या बाबतीत गेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल भलेही वेस्ट इंडिजसाठी कमी क्रिकेट खेळतो, पण त्याने 2017 मध्ये विविधी टी20 लीगमधून 4.5 मिलियन डॉलर तर जाहिरातींमधून 3 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.