मुंबई: क्रिकेट आणि सिनेमांचं नातं तसं खुपच जवळचं आहे. ही दोन्ही क्षेत्र ऎकमेकांचे हात हातात घालून चालत असतात. टीम इंडियाचा स्टार खेळाडू याचही सिनेमाचं कनेक्शन खूप आधीपासून आहे. आम्ही त्याच्या बॉलिवूड अफेअर्सबद्दल नाहीतर त्याच्या सिनेमा विषयी बोलतोय. म्हणजे युवराज सिंगने एका सिनेमात काम केले होते, याचा खुलासा झालाय.

हेजल किच या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लग्न करणा-या युवराज सिंगने एका सिनेमात काम केलं होत. हा सिनेमा 1992 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी युवराजचं वय 11 वर्ष होतं. फिल्म हिस्ट्री पिक्स नावाच्या ट्विटर हॅण्डलवर युवराजने काम केलेल्या सिनेमातील फोटो शेअर केले आहेत.

युवराज सिंगने एका पंजाबी सिनेमात ही भूमिका केली होती. गायक आणि अभिनेता हंस राज हंस यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मेहंदी शग्ना दी’ या पंजाबी चित्रपटात युवराज झळकला होता. सध्या युवराज आपल्या क्रिकेटमधील करिअरवर लक्ष केंद्रीत करतोय. क्रिकेटच्या करिअरमध्ये आतापर्यंत 300 सामने खेळल्याबद्दल त्याने आयसीसी चॅम्पियन्स करंडक 2017 दरम्यान ट्विट केलं.