नवी दिल्ली: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाला नमवून पाकिस्तान टीमने चॅम्पियन्स ट्रॉफीवर पहिल्यांदाच नाव कोरल्याने पाकिस्तानात जल्लोषाचा वातावरण आहे. काश्मीरमधील फुटीरतवादीही या विजयाने आनंदी झाले आहेत. हा आनंद व्यक्त करण्यासाठी हुर्रियतचे नेते मीरवाइज उमर फारुख यांनी पाकच्या अभिनंदनाचं ट्विट केलं. या ट्विटवर गौतम गंभीर चांगलाच भडकला आणि त्याने फारूख यांना खोचक सल्लाही दिला.

‘चहुकडे फटाके फुटताहेत. असं वाटतंय जणू ईद लवकर आलीय. चांगल्या संघाने बाजी मारली. पाकिस्तानचं अभिनंदन’, असं ट्विट फारुख यांनी केलं होतं.

फारूख यांच्या या ट्विटवरून सोशल मीडियावर वादळ आलंय. राजकीय लोकंही यावर प्रतिक्रिया देत आहेत. गौतम गंभीरनं हे ट्विट उशिरा पाहिलं, आणि त्या उशिरा कमेंट केली असली तरी या ट्विटने भारतीयांना चांगलाच आनंद झालाय. (हे पण वाचा: एकट्याने खिंड लढवणा-या हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम !)

‘मीरवाइज, तुम्ही सीमेपलीकडे का जात नाही. तिथे तुम्हाला आणखी चांगले फटाके (चिनी?) आणि ईदेचा जल्लोष पाहता येईल. तुम्हाला पॅकींग करण्यासाठी मी मदत करू शकतो’, असा फटका त्यानं लगावला. हे ट्विट १० हजाराहून अधिक ट्विपल्सनी ‘लाइक’ केलंय.

दरम्यान, फारूख यांच्या ट्विटवर आणि गौतम गंभीर याच्या ट्विटवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिलीये.