महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमने न्यूझीलंडच्या टीमवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भारतीय टीम वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये दाखल झाली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडचा तब्बल 186 रन्सने पराभव करत आपला विजय साजरा केला आहे.

टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 266 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या टीमला केवळ 186 रन्सपर्यंतच मजल मारता आली. राजेश्वरी गायकवाड हिने 15 रन्समध्ये पाच विकेट्स काढून न्यूझीलंडचा डाव लवकरच गुंडाळला. दिप्ती शर्माने २ विकेट्स घेत राजेश्वरीला साथ दिली. न्यूझीलंडच्या एकाही प्लेयरला या मॅचमध्ये 30 रन्सच्या पुढे रन करता आले नाही.

मॅचच्या सुरुवातीला भारतीय टीमची कॅप्टन मिताली राजने केलेली दमदार सेंच्युरी आणि वेदा कृष्णमूर्ती-हरमनप्रीत कौर यांनी केलेली हाफसेंच्युरीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध 50 ओव्हर्समध्ये 265 रन्स केले. (संबंधित बातमी: महिला क्रिकेट वर्ल्डकप: ऑस्ट्रेलियाचा भारतावर 8 विकेट्सने विजय)

मितालीने 123 बॉल्समध्ये 11 फोर मारत 109 रन्स केले. मितालीला कौरा आणि वेदाने चांगली साथ दिली. केवळ 21 रन्सवर भारताचे दोन विकेट्स आऊट झाले असताना मिताली आणि कौर यांनी टीमला सावरलं आणि तिस-या विकेटसाठी 132 रन्सची पार्टनरशिप केली. कौरने 90 बॉल्समध्ये 60 रन्स केले. त्यामुळे भारताला चांगला स्कोर उभारता आला.