मोहाली: पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने इंग्लंडवर तब्बल 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवाला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील इतिहासाला साजेशी खेळी करत भारताने या मालीकेवर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मोहाली येथे सोमवारी खेळल्या गेलेल्या तीसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडला 8 रणांनी पराभूत केले होते. तर, चौथ्या दिवशी खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 236 धावांत आटोपला. त्यामुळे इंग्लंडच्या वतीने भारतासमोर विजयासाठी केवळ 103 धावांचे लक्ष्य होते. अवघ्या 2 गड्यांच्या बदल्यात भारताने हे लक्ष्य अवघ्या दोन तासांतच पूर्ण केले.

भारताच्या वतीने पार्थिव पटेलने 67 धावा केल्या तर, कर्णधार विराट कोहली 6 धावांवर नाबाद राहिला. पार्तिवने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पार्थिवने 54 चेंडूत 67 धावा ठोकल्या. यात 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. भारताच्या वतीने मैदानात उतरलेला मुरली विजय शून्य तर, चेतेश्वर पुजारा 25 धावा करून मैदानात उतरला. मुरली विजयचा  इंग्लंडचा गोलंदाज क्रिस वॉक्सने बळी टीपला. तर, चेतेश्वर पुजाराला स्पिनर आदिल राशिदने बाद केले.(हेही वाचा, तब्बल ८ वर्षांनंतर या खेळाडूचे झाले भारतीय संघात पुनरागमन)

दरम्यान, रविंद्र जडेजाला पहिल्या डावात 90 धावा आणि एकुण सामन्यात 4 बळी घेतल्याबद्धल सामनाविर घोषित करण्यात आले. मध्यांतरापूर्वी भारताने 33 रन बनवल्या होत्या. तर, त्याआधी भारताचा मुरली विजय खातेही न खोलता पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यावेळी भारताकडून धावांची सरासरी षटकाला 7 अशी होती. दरम्यान, पार्थिव पटेल आणि चेतेश्वर पुजाराने भारताच्या डावाला आकार दिला. दोघांनी मिळून मध्यांतरापूर्वी 33 धावा जमवल्या. मध्यांतरानंतर दोघांची जोडी मैदानावर चांगलीच टिकून राहिली. दोघांनी मिळून 81 धावा केल्या. दरम्यान, चेतेश्वर पुजारा 25 धावांवर बाद झाला. जोडी फुटली. मात्र, पार्थिव पटेलने उत्कृष्ट खेळी कायम राखली. अखेर या खेळीने विजय भारताच्या खिशात जमा झाला.