ओवल : पाकिस्तान क्रिकेट संघाने अनोख्या फिल्डिंग, बॅटींगचा नजराणा पेश करत भारताला    रन्सनी सहज नमविले. पाकिस्तानच्या तळपदार बॅटींगपुढे भारताच्या बॉलर्सचा टिकाव लागला नव्हता. त्यामुळे 339 रन्सचे आव्हान भारतासमोर होते. हे आव्हान ‘विराट’ सेने सहज पार करेल  असा सर्वांना आत्मविश्वास होता. पण भारतीय बॅट्समनही एकामागोमाग एक गडगडले. चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला.

रोहित शर्मा पहिल्याच ओव्हरला भोपळाही न फोडता आमिरच्या ओव्हरला आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन कोहलीचीही 5 रन्सवर आमिरने विकेट घेतली. सर्व मॅचेसमध्ये बहारदार कामगिरी करणारा शिखर धवन आज केवळ 21 रन्स करु शकला. युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी क्रिजवर होते. आता काहीतरी करिश्मा होणार अशी भारतीयांना आशा होती. पण युवराज सिंगला शबाद खानने 22 रन्सवर एलबीडब्ल्यू आऊट केले.  तर एम.एस धोनी 4 रन्सवर हसनच्या बॉलींगला इमादकडे कॅच देऊन बाद झाला. जाधवने 9 रन्स केले. तर पांड्याने 76 रन्सची संघातील सर्वोत्तम खेळी खेळली. पण जडेजासोबत ताळमेळ न साधल्याने पांड्यादेखील रनआऊट झाला. जडेजाही 15 रन्सकरुन बाद झाला. त्यानंतर आलेले आश्विन, कुमार, बुमराह केवळ 1-1 रन्सच करु शकले.

भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधला  चॅम्पिअन्स ट्रॉफी 2017 च्या फायनलचा खेळ अपेक्षेप्रमाणे रंगतदार होत आहे. या सामन्यात सुरुवातीपासूनच पाकिस्तानची पकड मजबूत दिसली. पाकिस्तानने भारतासमोर  338 रन्सचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे भारताला चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकायची असेल तर 339  रन्सची आवश्यकता आहे. टीम इंडियाने टॉस जिंकत पहिल्यांदा पाकिस्तानला बॅटींगसाठी निमंत्रण दिले होते. टीम इंडियाने टॉस जिंकत पहिल्यांदा पाकिस्तानला बॅटींगसाठी निमंत्रण दिले होते. मात्र पाकिस्तान टीमने अपेक्षेपेक्षा जास्त चांगला स्कोर उभा केल्याचे दिसत आहे. अशात टीम इंडिया याला अशाप्रकारे गाठणार हे बघणे आणखीनच रोमांचक ठरणार आहे.

भारताला ज्या बॉलर्सकडून विकेट मिळण्याची आशा होती त्यांनी आज घोर निराशा केली. पाकिस्तानच्या सलामीच्या बॅट्समन्सनी भारतीय बॉलर्सची दाणादाण उडवून दिली. आश्विनला 10 ओव्हरमध्ये 70 रन्स मारले, ज्यामध्ये त्याने 4 वाईड बॉल्स टाकले. हार्दिक पांड्याला 10 ओव्हरमध्ये 1 विकेटच्या बदल्यात 53 रन्स द्यावे लागले. केदार जाधव अपेक्षेप्रमाणे लकी चाम्प ठरला. त्याने 3 ओव्हरमध्ये 27 रन्स देत 1 महत्त्वाचा विकेट घेतला.

फखर झमानने 12 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 114 रन्स केले. तर अझर अलीने 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने59 रन्स केले. बाबरनेही 4 फोर मारत 46 रन्स करत दाणादाण उडवून दिली. शोएब मलिकला आपला करिष्मा करता आला नाही. तो 12 रन्सवर आऊट झाला. भुवनेश्वरच्या बॉलिंगला केदार जाधवकडे त्याने कॅच दिली.

पाकिस्तानच्या सलामीच्या बॅट्समन्सनी भारतीय बॉलर्सची दाणादाण उडवून दिली. आश्विनला 10 ओव्हरमध्ये 70 रन्स मारले, ज्यामध्ये त्याने 4 वाईड बॉल्स टाकले. हार्दिक पांड्याला 10 ओव्हरमध्ये 1 विकेटच्या बदल्यात 53 रन्स द्यावे लागले. केदार जाधव अपेक्षेप्रमाणे लकी चाम्प ठरला. त्याने 3 ओव्हरमध्ये 27 रन्स देत 1 महत्त्वाचा विकेट घेतला.

फखर झमानने 12 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 114 रन्स केले. तर अझर अलीने 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने59 रन्स केले. बाबरनेही 4 फोर मारत 46 रन्स करत दाणादाण उडवून दिली. शोएब मलिकला आपला करिष्मा करता आला नाही. तो 12 रन्सवर आऊट झाला. भुवनेश्वरच्या बॉलिंगला केदार जाधवकडे त्याने कॅच दिली.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले आहेत. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तान टीमला धुळ चारली होती. त्यानंतर पाकिस्तान टीमने जबरदस्त प्रदर्शन करत फायनलपर्यंत धडक दिली आहे. आता पर्यंतचा इतिहास पाहता टीम इंडियाच पाकिस्तानवर वरचढ ठरली आहे. त्यामुळे या सामन्यात काय होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

भारताने सर्वात जास्त चॅम्पियन्स ट्रॉफीचे फायनल खेळलं आहे. तेच पाकिस्तानसाठी ही पहिलीच संधी आहे. भारताने पाकिस्तान विरूद्ध खेळलेल्या शेवटच्या 5 वन डे सामन्यांपैकी चारमध्ये विजय मिळवलाय. तेच इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांचं सांगायचं तर भारत याबाबतीत 3-1 ने पाकिस्तानच्या पुढे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही देशांमध्ये विजयाचा आणि पराभवाचा आकडा 2-2 असा सारखा आहे. (हे पण वाचा: काय भारत-पाक फायनल सामना क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा सर्वात जास्त बघितला जाणारा सामना ठरेल ?)

 

टीम इंडिया :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंग, एम. एस. धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक, मोहम्मद शमी, अजिंक्य रहाणे, उमेश यादव.

टीम पाकिस्तान :
सरफराज अहमद (कर्णधार), अमहद शहजाद, अझहर अली, बाबर आजम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, हसन अली, मोहम्मद आमिर, रुम्मान रईस, जुनेद खान, इमाद वसीम, फहीम अश्रफ, शादाब खान, फखर जमान, हारिस सोहेस.