सन 2005 – 06 मध्ये भारतीय संघात एक असा चेहरा सहभागी झाला ज्यामुळे क्रिकेट जगतात एक वेगळाच गोंधळ माजला. याचं कारण ही तसंच होतं भारतीय क्रिकेट संघात अनेक वर्षानंतर धुआंधार तेज गोलंदाज सहभागी झाला होता. आणि या खेळाडूला भारतातील सर्वात फास्ट बॉलर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या खेळाडूची तुलना विश्वातील फास्ट बॉलरसोबत कायम केली जाते. त्यामुळे या खेळाडूच्या येण्याने क्रिकेट प्रेमींना वाटलं की आता भारतीय संघाला एक मोठा फास्ट बॉलर भेटला पण या क्रिकेट प्रेमींनी ही इच्छा पूर्ण झाली नाही… याला कारण देखील तसंच ठरलं…

भारताने 2011 साली वन डे विश्वचषक जिंकून इतिहास रचला. या ऐतिहासिक संघात मुनाफ पटेलचाही समावेश होता. गुजरातच्या इखार या छोट्या गावात जन्मलेल्या मुनाफ पटेलने एक नामांकित गोलंदाज म्हणून नाव कमावलं. भारताने 2011 साली वन डे विश्वचषक जिंकून इतिहास रचला. या ऐतिहासिक संघात मुनाफ पटेलचाही समावेश होता. गुजरातच्या इखार या छोट्या गावात जन्मलेल्या मुनाफ पटेलने एक नामांकित गोलंदाज म्हणून नाव कमावलं.

खरं तर त्याला क्रिकेटमध्ये रस नव्हता. घरच्या गरिबीमुळे तो लहानपणापासूनच काम करायचा. एका मार्बल फॅक्ट्रीमध्ये तो रोजंदारीला जात असे. त्यासाठी त्याला 35 रुपये मिळत. मुनाफ पटेलचे वडील दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीला जात होते. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळेच मुनाफ स्वत: काम करत असे. 

munaf

मुनाफ शाळेत होता त्यावेळी तो क्रिकेट खेळायचा. मात्र शास्त्रशुद्ध क्रिकेट प्रशिक्षणासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. पण परिसरातील वेगवान गोलंदाज म्हणून त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मुनाफ शाळेत क्रिकेट खेळायचा, शिवाय घरच्या परिस्थितीमुळे तो मोलमजुरीही करायचा. हीच  बाब मुनाफच्या मित्रांनी शिक्षकांना सांगितली.

त्यावेळी शिक्षकांनी मुनाफला सांगितलं की, “तुझं पैसे कमावायचं वय होईल, तेव्हा पैसे कमव, पण आता तू खेळावर लक्ष दे”. काही वर्षांनी मुनाफची युसूफ नावाच्या मित्राशी ओळख झाली. युसूफच मुनाफला क्रिकेट खेळण्यासाठी बडोद्याला घेऊन आला. मुनाफ आधी चप्पल घालून क्रिकेट खेळायचा. मात्र युसूफनेच त्याला बूट खरेदी करुन दिले, त्याचं क्रिकेट क्लबमध्ये अॅडमिशनही केलं.

सचिन तेंडुलकर आणि एम एस धोनीसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत 2011 च्या विश्वचषकात खेळलेला मुनाफ पटेल आजही त्याच्या गावात राहतो. क्रिकेटमुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्यामुळे, गाववाल्यांच्या मदतीला तो धावून जातो. गावातील प्रत्येकजण आर्थिक मदतीसाठी मुनाफकडे जातो. याबाबत मुनाफ म्हणतो, “जर कोणी मदतीसाठी आला आणि मी त्याला प्रश्न विचारला, तर माझे वडील म्हणतात, तुझ्या प्रश्नांनी त्याचं पोट भरणार नाही, त्याला मदत हवी आहे ती मदत कर”

मुनाफ पटेलचं क्रिकेट खेळणं वडिलांना पसंद नव्हतं. मुनाफने आफ्रिकेला जाऊन पैसे कमवावे अशी त्यांची इच्छा होती. त्याच्या इखार गावचे अनेक तरुण काम आणि पैसे कमवण्यासाठी आफ्रिकेला जात होते. शिवाय मुनाफचे काही नातेवाईकही कामानिमित्त आफ्रिकेत होते, त्यामुळेच त्याने तिकडे जावं अशी वडिलांची इच्छा होती. 

माजी क्रिकेटर किरण मोरे यांनी 2003 मध्ये मुनाफच्या प्रशिक्षणादरम्यान त्याची गोलंदाजी पाहिली. त्यांनी तातडीने त्याला चेन्नईला प्रशिक्षणासाठी पाठवलं. चेन्नईत दिग्गजांसोबत त्याला प्रशिक्षण घेता आलं. डेनिस लिली आणि स्टीव वॉसारख्या खेळाडूंनी त्याच्या गोलंदाजीचं कौतुक केलं.

मुनाफ पटेल 2006 ते 2011 पर्यंत भारतीय संघात होता. विश्वचषक जिंकल्यानंतर दुखापतीमुळे तो अनेक महिने क्रिकेटपासून दूर राहिला. मात्र त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थानच मिळालं नाही. मुनाफ भारताकडून 2007 आणि 2011 च्या विश्वचषकात खेळला आहे.