नवी दिल्ली: सलग 11व्यांदा विंबल्डनच्या फायनलमध्ये पोहोचत रॉजर फेडररने नव्या विक्रमासाठी कूच केले आहे. सेमीफायनलमध्ये रॉजरने चेक रिपब्लिकच्या टॉमस बर्डिच याला 7-6, 7-6, 6-4 अशा फरकाने पहाभूत केले. या आधी 2010मध्ये झालेल्या एका साम न्यात बर्डिचने फेडररला पराभूत केले होते. आतापर्यंतची कामगिरी पाहता याही वेळा फेडरर विरूद्ध बर्डिच हा सामना काट्याची टक्कर ठरला. मात्र, फेडररने या वेळी कोणतीही चूक न करता आपला सर्व अनुभव पणाला लावत बर्जीचला धूळ चारली. या विजयामुळे फेडररचा विंबल्डनच्या अंतीम सामन्यात 11व्यांदा पोहोचण्याचा मार्ग सुखकर झाला. फेडररने जर अंतीम सामनाही जिकला तर, त्याला मिळणारा हा आठवा किताब ठरणार आहे.

दरम्यान, क्रोएशियाचा टेनीसपटू मारिन सिलिक आता अंतिम सामन्यात रॉजररला टक्कर देईल. अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्याची सिलिकची ही पहिलीच वेळ आहे. सिलिकने यापूर्वी ब्रिटनचा विश्वविजेता खेळाडू एंडी मरेला पराभूत करणारा अमेरीकेचा खेळाडू सॅम क्वेरी याला पराभूत करत अंतीम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. सिलिक आणि सॅम यांच्या तब्बल दोन तास 56 मिनीटांपर्यंत लढाई झाली. 6-7(6-8), 6-4, 7-6 (7-3), 7-5 अशी दमदार कामगिरी करत सिलिकने दुसऱ्यांदा ग्रैंड स्लैम टूर्नामेंटच्या फायनलमध्ये प्रवेश केला. दरम्यान, यापूर्वी सिलीकने 2014मध्ये अमेरिकेमध्ये झालेल्या स्पर्धेत ओपन फायनलमध्ये प्रवेश करत विजय मिळवला होता. त्यामुळे त्याच्या नावावर हा एकमेव ग्रॅंड स्लॅम चषक आहे. त्यामुळे रॉजर फेडरर सोबत होत असलेल्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, नग्न फोटो काढून शेअर केली ‘मन की बात’)

दरम्यान, फेडरर खेळत असलेली ही 29 वी ग्रँडस्लॅम फायनल आहे. विम्बल्डनची अंतिम फेरी खेळणारा फेडरर हा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. फेडरर 35 वर्षांचा आहे. यापूर्वी केन रोसवेलने 39 व्या वर्षी विम्बल्डनची फायनल खेळली होती. या दोघांमध्ये कोण बाजी मारणार हे लवकरच समजणार आहे.