लंडन: रॉजर फेडररने विम्बलडनच्या पुरूष एकेरीत विजेतेपद आठव्यांदा जिंकत विक्रम केला.  क्रोशियाच्या मरिन चिलिचचे आव्हा रॉजरने एकहाती परतवून लावत विजयी खेळी केली. लंडनच्या कोर्टवर रंगलेल्या या सामन्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. ६-२, ६-१, ६-४ अशी सरळ सेटमध्ये खेळी करत रॉजरने चिलिचला धूळ चारली. रॉजरच्या या विजयामुळे त्याने आठव्यांदा विम्बल्डनवर नाव कोरले. याआधी फेडरर व पीट सॅम्प्रस यांनी प्रत्येकी सात वेळा विम्बल्डन जिंकले होते. त्यामुळे यंदाची स्पर्धा जिंकून फेडरर पीटला मागे टाकणार का? याबाबत रॉजरच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता होती.

फेडररने खेळलेली ही 29 वी ग्रँडस्लॅम फायनल होती. या निमित्ताने विम्बल्डनची अंतिम फेरी खेळणारा फेडरर हा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. फेडरर 35 वर्षांचा आहे. यापूर्वी केन रोसवेलने 39 व्या वर्षी विम्बल्डनची फायनल खेळली होती.  28 वर्षीय सिलिचने पहिल्यांदाच विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती. ही त्याची दुसरी ग्रँडस्लॅम फायनल होती. 2014 मध्ये त्याने यूएस ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारा क्रोएशियाचा हा दुसराच खेळाडू आहे. स्वीत्झर्लंडच्या या महान खेळाडूच्या आव्हानाचा सामना करणे प्रतिस्पर्धी मारिन सिलिचला शक्य झाले नाही. पहिला गेम जिंकत सिलिचने चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर फेडररच्या आव्हानासमोर त्याची डाळ शिजली नाही. (हेही वाचा, नग्न फोटो काढून शेअर केली ‘मन की बात’)

दरम्यान,  अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्याची सिलिकची ही पहिलीच वेळ होती. सिलिकने यापूर्वी ब्रिटनचा विश्वविजेता खेळाडू एंडी मरेला पराभूत करणारा अमेरीकेचा खेळाडू सॅम क्वेरी याला पराभूत करत अंतीम सामन्यात प्रवेश मिळवला होता. सिलीकने यापूर्वी 2014मध्ये अमेरिकेमध्ये झालेल्या स्पर्धेत ओपन फायनलमध्ये प्रवेश करत विजय मिळवला होता. त्यामुळे त्याच्या नावावर हा एकमेव ग्रॅंड स्लॅम चषक आहे. त्यामुळे रॉजर फेडरर सोबत होत असलेल्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.