मुंबई: क्रिकेटचा देव म्हणून लोकप्रियता मिळालेला मस्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव कानावर पडताच क्रिकेटचा विचार मनात घोळायला लागतो. जितके वर्ष सचिन खेळला त्याने सर्वांनाच भारावून सोडले. त्याचं करिअर जितकं शानदार होतं तितकीच त्याची लव्हस्टोरीही रोमांचक होती. सचिन आणि अंजली यांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाच्या कथानकापेक्षा जराही कमी नाहीये. सचिन अंजलीपेक्षा तब्बल ६ वर्षांनी लहान आहे. क्रिकेटच्या पिचवर धमाल उडवणा-या सचिनची प्रेमाच्या पिचवरील खेळी कशी होती हे जाणून घेऊया…..

सचिनला ओळखलं नव्हतं अंजलीने:
अंजली आपल्या आईला रिसीव्ह करण्यासाठी एअरपोर्टला गेली होती. सचिन तिथेच होता. सचिनला एअरपोर्टवर पाहिल्यावर अंजलीने सचिनला ओळखले नव्हते. तेव्हा अंजलीला सचिन खूप क्यूट वाटला होता. एका मैत्रीणीच्या सांगण्यावरून नंतर ती सचिनचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धावत गेली होती. तेव्हाही सचिन खूप लाजाळू होता, त्यामुळे काहीही न बोलता तो गपचूप आपल्या गाडीत जाऊन बसला होता.

sachin-tendulkar-and-anjali-tendulkar651x386

पहिल्या नजरेत जडलं अंजलीवर प्रेम:
सचिन आणि अंजलीची पहिली भेट एअरपोर्टवर झाली होती. अंजली मेडिकल स्टुडंट होती आणि सचिन क्रिकेटमध्ये आपलं नाव उंचावत होता. १९९० मध्ये मुंबई या दोघांची भेट मुंबई एअरपोर्टवर झाली होती. अंजलीला पाहताक्षणीच सचिन तिच्या प्रेमात पडला होता.

कसा मिळाला नंबर:
त्यावेळी मोबाईल फोन नसायचे. अशात अंजलीने मोठ्या मेहनतीने सचिनच्या घरचा नंबर मिळवला. नंतर ती नेहमीच तिच्या घरच्या नंबरवर फोन करत होती. दोघांचं हे बोलणं नंतर प्रेमात रूपांतर झालं.

Anjali-Tendulkar-

पत्रकार बनून सचिनच्या घरी पोहचली अंजली:
अंजलीने एका मुलाखतीत सांगितले होते की, एकदा सचिनला भेटण्यासाठी ती पत्रकार बनून सचिनच्या घरी पोहचली. तर ती पत्रकार नसल्याचा संशय सचिनच्या आईला आला होता. कारण सचिनने कधीही कोणत्याही महिला पत्रकारला मुलाखत दिली नव्हती. ना कोणता पत्रकार त्यांच्या घरी आला होता.

सरदारच्या लूकमध्ये गेला सचिन सिनेमा बघायला:

सचिन चांगलाच लोकप्रिय झाला होता. अशात दोघेही सहज बाहेर जाऊ शकत नव्हते. अंजलीसाठी सचिनने सरदारजीचा लूक केला होता. यावेळी ते ‘रोजा; हा सिनेमा बघायला तसेच गेले होते. इंटरव्हलपर्यंत सगळं ठिक होतं मात्र नंतर हा व्यक्ती सचिन असल्याचे सर्वांच्या लक्षात आले होते. नंतर सचिन अंजलीला सोडून बाहेर पळाला होता.

article-l-2016410416294259382000

लग्नाची बोलणी करायला गेली अंजली सचिनच्या घरी:

कमी बोलणारा सचिन अंजली सोबत लग्न करण्याचा विषय आईकडे काढू शकला नव्हता. अशात त्याने अंजलीलाच दोघांच्या लग्नाचा विषय काढण्यास सांगितले. सचिनच्या प्रेमाखातर अंजलीने हे पाऊल उचलले आणि ती स्वत: लग्नाची बोलणी करण्यासाठी सचिनच्या घरी पोहचली.

पाच वर्ष होते रिलेशनशीपमध्ये:
अंजली आणि सचिनचं अफेअर साधारण ५ वर्ष चालू होतं. त्यानंतर सचिनच्या वाढदिवसाच्या दिवशी २४ एप्रिल १९९५ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला. नंतर एका महिन्याने २३ मे १९९५ रोजी त्यांचं लग्न झालं.