नवी दिल्ली: रिलायंस जियो आलं आणि सर्व मोबाईल कंपनीचं कंबरडं या कंपनीनं मोडलं. मोबाईलवर मोफत डेटा आणि कॉल देऊन जियोनं एकच खळबळ उडवली. जियोमुळे पडणारा प्रभाव पाहून इतर कंपनीनंही त्यानंतर फ्रि डेटा आणि कॉलची सुविधा देण्यास सुरूवात केली. त्यानंतर वायलेस डेटावरून युद्ध सुरू झालं. एअरटेल आणि रिलायंस जियोच्या या युद्धात ग्राहकांना चांगलाच फायदा झाला. आता या कंपन्यांमध्ये ब्रॉडबॅन्ड इंटरनेटमध्ये युद्ध होणार आहेत. त्यामुळे याचा ग्राहकांना मोठा फायदा होऊ शकतो..

ब्रॉडबॅन्ड सेवेचा फायदा मिळण्याचं कारण म्हणजे भारती एअरटेल एक नवीन स्किम लॉन्च करणार आहे. यात एकाच किमतीत दुप्पट हायस्पीड डेटा ग्राहकांना मिळणार आहे. तसंच ही सेवा पहिले 90 दिवस फ्रि असणार आहे. ग्राहक दुसरीकडे जाऊ नये यासाठी ही नवीन स्किम लॉन्च करण्यात येत आहे. तर दुसरीकडे रिलायन्स जियो या सेवेत ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा जियो फायबर सुरू करणार आहे. पण जियोच्या या योजनेपूर्वीच एअरटेलने आपली तयारी सुरू केली असून आता या दोघांच्या युद्धात ग्राहकाला चांगलाच लाभ होणार आहे.

भारती एअरटेलचे सीईओ हेमंतकुमार गुरुस्वामी यांनी सांगितले की, या नव्या योजनेमुळे हायस्पीड ब्रॉडबॅण्ड ज्यांना आपल्या घरामध्ये वापरावयाचा आहे, अशा ग्राहकांची संख्या वाढणार आहे, असा आम्हाला विश्‍वास वाटतो. सध्या रिलायन्स जियो कंपनी मुंबई, दिल्ली-एनसीआर, अहमदाबाद, जामनगर, सुरत, वडोदरा यासारख्या निवडक ठिकाणी जियो फायबरद्वारे तेथील ग्राहकांना चाचणी सेवा देत आहे. येत्या जूनमध्ये जियो ही सेवा लॉन्च करू शकते. या सर्व पार्श्‍वभूमीवर एअरटेल आपली ब्रॉडबॅण्ड योजना सादर करण्यासाठी पूर्ण तयारीत आहे.

(सिम कार्ड घेण्यासाठी तुमहाला आता हे करावंच लागणार)

मोठय़ा स्वरूपात इंटरनेट वापर करणार्‍यांसाठी ब्रॉडबॅण्ड सेवा महत्त्वाची माली जाते. सध्या एअरटेलकडे 19.6 लाख इतके ग्राहक असून बीएसएनलकडे सर्वात जास्त म्हणजे 1 कोटी ब्रॉडबँडचे ग्राहक आहेत. देशामध्ये 31 जानेवारी 2017 पर्यंत ब्रॉडबॅन्ड ग्राहकांची संख्या 1,868 कोटी होती. देशाच्या लोकसंख्येचा विचार करता ही संख्या एकंदर लोकसंख्येच्या तुलनेत 2 टक्क्यांपेक्षा काहीशी कमी आहे.