मुंबई – आयफोन 8 फोन लाँच होण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे आयफोनप्रेमींची उत्सुकता आणखीनच वाढत आहे. मात्र, हा आयफोन 8 लाँच होण्यापूर्वीच त्याचे फिचर्स लीक झाले आहेत. आयफोन्ससोबतच त्याच्या किमतींचीही तितकीच चर्चा होताना दिसत आहे. पाहूयात लीक झालेल्या फिचर्सनुसार कसा असेल आयफोन 8…

आयफोन 8चे लीक झालेले फोटो पाहता फोनचं डिझाईनमध्ये अनेक बदल केल्याचं स्पष्ट दिसत आहे. आयफोन 8 च्या लीक झालेल्या फोटोंनुसार दावा करण्यात येत आहे की, यामध्ये बेजल-लेस डिस्प्ले असणार आहे. आयफोन 8 मधील सर्वात महत्त्वाचं फिचर्स म्हणजे वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात येणार आहे.

लीक झालेल्या फोटोंमध्ये फोनची टेम्पर ग्लास, नेक्स्ट जनरेशन ओलईडी स्क्रीन, वायरलेस चार्जर आणि स्क्रीनची चर्चा सर्वाधिक होत आहे. रिपोर्ट्सनुसार, आयफोन 8ची स्क्रिन 5.8 इंच लांब असणार आहे. तसेच या फोनमध्ये ड्यूल-लेन्स थ्री डी कॅमेरा असू शकतो. (हे पण पाहा: मोटो सी प्लस हा सर्वात स्वस्त फोन झाला लाँच)

लीक झालेल्या फोटोनुसार ड्युअल कॅमेरा आडव्या ऐवजी उभा असू शकतो. तसेच फिंगरप्रिंट सेन्सर पुढच्या बाजुने असण्याची शक्यता आहे. असे म्हटलं जात आहे की, सॅमसंगप्रमाणेच आयफोनमध्येही बायोमेट्रीक टेक्निकचा वापर करण्यात येणार आहे.

आयफोन 8 हा फोन सप्टेंबरमध्ये लॉन्च करण्याच निर्णय कंपनीनं घेतला आहे. मात्र, कंपनीनं याबाबत कुठलाही अधिकृत खुलासा केलेला नाहीये.