नवी दिल्ली :  गुगल मॅपच्या साहाय्यानं आपल्याला आवश्यक त्या ठिकाणी पोहोचता तर येतं, पण ज्या गाडीनं आपण प्रवास करतोय ती गाडी कुठं पार्क करायची हा मोठा प्रश्न निर्माण व्हायचा. मात्र गुगल मॅपच्या या नवीन सुविधेमुळे पार्किंग असलेले ठिकाणं आणि पार्किंगच्या स्थितीची माहिती मिळणार आहे.

Google-Now-parking1

जगातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या गुगल या सर्च इंजिनने आपले नवे गुगुल एपचे फिचर आणले आहे. यामध्यमातून पार्किंगमधली तुमची कार (गाडी) कुठे उभी आहे त्या ठिकाण तुम्हाला माहिती पडणार आहे. गुगल मॅपचे हे फिचर एंड्रॉईड आणि आईओएस या दोन्ही युजर्ससाठी असणार आहे. ( शोधा तुमचा हरवलेला ऍन्ड्रॉइड मोबाईल)

काय करावे लागेल?

याच्या वापरासाठी गुगल मॅपचे लेटेस्ट वर्जन डाऊनलोड कराव लागणार आहे.  एंड्रॉईड युजर्सना कार पार्किंग करताना मॅपवर दाखविलेल्या निळ्या डॉटवर टच करावे लागणार आहे. त्यानंतर सेव युअर पार्कंग चे ऑप्शन मिळेल. तिथे तुम्हाला लोकेशन सेव करावे लागेल. जेव्हा खुप तासांनंतर तुमच्या कार जवळ येत असाल तेव्हा गुगल मॅप तुम्हाला सहजपणे तुमच्या कारपर्यंत पोहोचवेल.

(http://www.india.com/marathi/technology/google-map-launch-new-feature-about-parking/आयफोन युजर्ससाठी..आता गुगल मॅप दाखवणार पार्किंगची जागा)

आयफोन युजर्सना यात थोडे एकवांस फिचर मिळणार आहे. यातून स्वत: हून पार्किंग डिटेक्शन होणार आहे. यामध्ये सुरुवातीला निळ्या डॉटला टच करण्याची गरज भासणार नाही.  यामध्ये सेव युअर पार्किंगचे ऑप्शन असेल त्यानतर ते आपोआप डिटेक्शन मोडवर जाणार आहे.

याव्यतिरिक्त, जर तुम्ही तुमच्या आयफोनला युएसबीने कारशी कनेक्ट केले असेल तर कारमधून बाहेर पडताना लोकेशन गुगल मॅपमध्ये पार्किंग लोकेशनची जागा एड होणार आहे.  त्यानंतर पुन्हा हे ऑटोमॅटिक मोडवर जाणार आहे.