मुंबई: रिलायन्स जिओ तसेच, इतर अनेक मातब्बर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत बाजारपेठेतील आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी व्होडाफोनने ग्राहकांसाठी विशेष ऑफर लॉंच केली आहे. व्होडाफोनच्या या नव्या कोऱ्या ऑफरमुळे ग्राहकांना चक्क 45GB डेटा चक्क मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे ही ऑफर 11 मेपासून लागू आहे.

व्होडाफोनने लॉंच केलेली ही ऑफर नवा स्मार्टफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी असणार आहे. तसेच, नवा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाने जर तो स्मार्टफोन ऍमेझॉनवरून खेरेदी केला तर, व्होडाफोन त्या ग्राहकास चक्क 45GB डेटा फ्री देणार आहे.

काय आहे ऑफर?

ग्राहकाने जर 1GB किंवा त्यापेक्षा अधिकचा प्लान घेतला तर, त्याला 9GB डेटा मिळेल. पण, त्याच ग्राहकाने जर पाच महिन्यांसाठी जर 9GB डेटा घेतला तर, त्याला 45GB डेटा मिळेल. ही ऑफर 30 जून पर्यंत उपलब्ध असून, ग्राहकांना या एस्क्लुजीव ऑफरचा लाभ ऍमेझॉनवर घेता येणार आहे. मात्र, या ऑफरसाठी ग्राहकाला 4G स्मार्टफोन खरेदी करावा लागेल.(Nokia 3310 पुन्हा जाग्या करणार जुन्या आठवणी)

डेटा कसा मिळवाल?

नव्या स्मार्टफोनमध्ये सीम इनसर्ट करताच 1GB डेटावर 9GB डेटा मिळवा, असा मेसेज प्रिपेड ग्राहकांना येईल. त्यानंतर हा 9GB डेटा 28 दिवस वापरता येईल. 1GB प्लॅनच्या रिचार्जनंतर आपोआप 9GB डेटा दिला जाईल. पाच वेळा या ऑफरचा फायदा घेता येईल. या ऑफरला ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे लवकरच समजणार आहे.